spot_img
ब्रेकिंगगुलाबी थंडीत रंगले शेकोटी काव्य संमेलन;पारनेर साहित्य साधना मंचचा उपक्रम

गुलाबी थंडीत रंगले शेकोटी काव्य संमेलन;पारनेर साहित्य साधना मंचचा उपक्रम

spot_img

निघोज | नगर सह्याद्री 
गुलाबी थंडीची हुडहुडी. सडा, रांगोळीसह सजवलेल्या रानात पेटलेली शेकोटी. शेकोटी भोवती सादर होणार्‍या एकाहून एक सरस कविता, गझल व बेभान होऊन ऐकणारे श्रोते असे अनोखे काव्य संमेलन नुकतेच निघोज येथे रंगले. पारनेर साहित्य साधना मंचने या संमेलनाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर ज्येष्ठ गझलकार संजय पठाडे, ज्येष्ठ साहित्यिक कारभारी बाबर, ज्येष्ठ कवी गुलाबराजा फुलमाळी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

निघोज येथील युवा कवी संदीप राठोड यांनी शेकोटी काव्य मैफिलीसाठी कवींना निमंत्रित केले होते. शेकोटी प्रज्वलन करून आणि रोपट्याला पाणी घालून मैफिलीची सुरुवात करण्यात आली. कवी सोमनाथ चौधरी, संदीप राठोड, रामदास पुजारी, डॉ. प्रवीण जाधव, साहेबराव घुले, अशोक गायकवाड, भाऊसाहेब गवळी, संदीप रासकर, गुलाबराजा फुलमाळी व भाऊ राऊत इत्यादी कवींनी एकाहून एक सरस कविता व गझल सादर केल्या. त्यांना श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

ज्येष्ठ गझलकार संजय पठाडे यांनी नवोदित कवींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कविता ही वेदनेचा हुंकार आणि काळजाचा झंकार असते. नवकवींनी प्रसिद्धीचा हव्यास धरून उथळपणे न लिहिता सखोल चिंतन करावे. पठाडे यांनी काही बहारदार रचना सादर केल्या. त्या ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले.
संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी कवितेवर भाष्य करताना म्हटले की, आईच्या प्रेमातून आणि पांडुरंगाच्या भक्तीतून कवितेची प्रेरणा मिळते. पारनेरसारख्या ग्रामीण भागात दर्जेदार कविता लिहिली जाते याचे कौतुक वाटते. यानंतर वानखेडे यांनी विविध रचना सादर करून श्रोत्यांना अंतर्मुख केले.

कवी संमेलनानंतर सर्वांनी शेकोटीभोवती सहभोजनाचा आस्वाद घेतला. राठोड परिवाराने संमेलनाची संपूर्ण व्यवस्था केली होती. संमेलनाला राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक बन्सी गुंड, अ‍ॅड. नंदकुमार पवळे, रामदास भुकन, राजेंद्र भुकन, संपत रसाळ, पत्रकार आनंद भुकन, सागर अनंत, राम भुकन, नवनाथ चव्हाण, विशाल चव्हाण यांच्यासह अनेक श्रोते उपस्थित होते. संदीप राठोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप रासकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. प्रवीण जाधव यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...