अहिल्यानगर । नगर सहयाद्री
जिल्हा रुग्णालयातुन पळालेला आरोपीला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर (वय 22, रा.सोनई, ता.नेवासा) असे आरोपीचे नाव आहे. सोनई पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे.
शुक्रवार दि.(२ मे) रोजी जमावाकडून मारहाण झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवार दि.( ७ मे) रोजी रात्री पोलीसांची नजर चुकवून त्याने धूम ठोकली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाला आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले. पथकाने गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला पुढील तपासकामी सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पथकातील पोसई/ तुषार धाकराव व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पवार, फुरकान शेख, रविंद्र घुंगासे, मयुर गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने बजावली आहे.