spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित खुन प्रकरणातील आरोपींना जन्मठेप!

अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित खुन प्रकरणातील आरोपींना जन्मठेप!

spot_img

राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
श्रीरामपूर येथे अडीच वर्षांपूव भांडणाच्या कारणवरून झालेल्या योगेश किसन वाघमारे या युवकाच्या खुनातील सहा आरोपींना राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच प्रत्येकी 35 हजार रुपये दंडही ठोठावला आहे. या खटल्याची अधिक माहिती अशी, की श्रीरामपूर येथे 23 मे 2025 रोजी कुकी हॉटेल येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरून योगेश किसन वाघमारे यास ललित पाळंदे व राहुल धीवर यांनी त्यांच्या मोटारसायकलवरून राहात्यात आंबेडकरनगर येथील संजय निकाळे याच्या घरी पळवून नेले.

तेथे रवि दशरथ कटारनवरे, वीरेन उर्फ पिंटू दशरथ कटारनवरे, दशरथ कटारनवरे, भूषण संजू निकाळे, योगेश निकाळे, संजय दादू निकाळे, रतनबाई दशरथ कटारनवरे, मणिका वाघमारे, अमित चंद्रकांत वाघमारे, संगीता संजय निकाळे, उत्कर्ष उर्फ भैय्या सोमनाथ लुटे, सोमनाथ लुटे, विशाल मोकळ, महेश सोमनाथ पाळंदे, गौतम सोमनाथ पाळंदे, अमोल सोमनाथ पाळंदे (सर्व राहणार राहाता) यांनी संगनमत करून योगेश वाघमारे याला ठार मारण्याची योजना आखली. रवि कटारनवरे याने योगेश वाघमारे याच्या छातीत तलवारीने तर संजय निकाळे, ललित बाबासाहेब पाळंदे यांनी आपल्या हातांतील कोयत्याने योगेश वाघमारेच्या डोक्यावर व हातावर वार केला. या मारहाणीत योगेश वाघमारे याचा मृत्यू झाला.

योगेश वाघमारे याचे वडील किसन वाघमारे यांनी राहाता पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार गु. र. नं. 243/2022 भादविक 302, 363, 324, 143, 147, 148, 149, 504, 506 आर्म ॲक्ट क 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. 18 आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. या गुन्ह्याचा तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी करून राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकून 09 साक्षीदार तपासण्यात आले.

त्यात प्रत्यक्षदर्शी व अन्य साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सबळ पुरावा व वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून राहाता सत्र न्यायालयाने राहुल एकनाथ धीवर, ललित बाबासाहेब पाळंदे, रवि दशरथ कटारनवरे, वीरेन उर्फ पिंटू दशरथ कटारनवरे, विशाल मायकल मोकळ, योगेश निकाळे (सर्व राहणार आंबेडकरनगर) या सहा आरोपींना जन्मठेप आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे अभियोक्ता डी. बी. पानगव्हाणे, पी. व्ही. बुलबुले यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी अभियोक्ता मयूरेश नवले यांनी सहाय केले. या खटल्याच्या कार्यकाळात अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, राहाता पोलीस ठाण्याचे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर मनपा पहिल्या स्थानावर’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत दुसऱ्या तिमाहीमध्ये (ऑक्टोबर ते डिसेंबर...

आयेशा हुसेन नगरच्या हप्तेखोरीत देखील अव्वल!

नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालेल्या नगरच्या आरटेीओ कार्यालयातील आयेशा हुसेन यांनी ‌‘वसुली‌’ टोळी सुरू केल्याचा...

शिरूर-पुणे रस्त्याशी तुमचा संबंध काय? राहुल पाटील शिंदे यांनी खा. लंके यांच्यावर डागली तोफ

पारनेर | नगर सह्याद्री:- ज्या जनतेने निवडून दिले, त्यांना वाऱ्यावर सोडले! ज्या कामाशी तुमचा संबंध...

आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’ कडे नेणारा अर्थसंकल्प; मंत्री विखे पाटील

अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार, प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केंद्रीय...