spot_img
अहमदनगरपडद्यामागील सुत्रधार राजेंद्र नागवडेंना आरोपी करा!; काय आहे प्रकरण पहा...

पडद्यामागील सुत्रधार राजेंद्र नागवडेंना आरोपी करा!; काय आहे प्रकरण पहा…

spot_img

पारनेरमधील राजेशिवाजी, गोरेश्वर या पतसंस्थांमधील बोगव कर्जवितरणातून ठगविणारा पोपट ढवळे हा फक्त प्यादा! / पारनेर, नगरमधील ठेवीदार वांगदरीत नागवडेंच्या घरासमोर करणारा मुंडन आंदोलन | पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

बोगस कर्ज प्रकरणाने पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी आणि गोरेश्वर या पतसंस्था अडचणीत आल्या. या संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या पतसंस्थेत अडकल्या आहेत. या दोन्ही पतसंस्था अडचणीत आणण्याचे पाप वांगदरी (श्रीगोंदा) येथे स्थायिक झालेले पोपट ढवळे याचे आहे. राजेंद्र नागवडे यांच्याशी संबंधित ज्ञानदिप शिक्षण संस्थेतील पोपट ढवळे व त्याच्या १५ सहकार्‍यांच्या नावावर जवळपास प्रत्येकी दीड कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे दिसते. या कर्मचार्‍यांनी आपल्याला कर्जाची ही रक्कम मिळालीच नसल्याचे म्हटले आहे. कोट्यवधी रुपयांची ही रक्कम कर्मचार्‍यांच्या नावावर असली तरी प्रत्यक्षात ही रक्कम राजेंद्र नागवडे यांनीच घेतली असल्याचा आरोप ठेवीदार आणि सभासदांनी केला आहे. कर्मचार्‍यांच्या पगारातून कर्ज वसुली आदेश होऊनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही न करणार्‍या राजेंद्र नागवडे यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

याबाबतची अधिकची माहिती अशी की, कान्हूरपठार आणि गोरेश्वर या दोनही पतसंस्था पारनेर तालुक्यातील आहेत. या पतसंस्थांच्या पदाधिकार्‍यांना टक्केवारी देताना नगरमधील काळभोर या कमिशनखोराने दलाली केली. त्याच्याच मध्यस्थीने या पतसंस्था पदाधिकार्‍यांनी पोपट ढवळे याच्यामार्फत राजेंद्र नागवडे यांच्याशी संपर्क केला. वांगदरी, श्रीगोंदा फॅक्टरी येथे या पतसंस्था पदाधिकारी आणि नागवडे यांची बैठक लावून देण्याचे काम पोपट ढवळे याने केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

राजे शिवाजी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन आझाद ठुबे आणि गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंद यांच्याशी संधान साधून पोपट ढवळे याने कोट्यवधी रुपयांचे विनाजामिनकी आणि विनातारणाचे कर्ज घेतले. हे कर्ज देताना पतसंस्था पदाधिकार्‍यांना कमिशन देण्यात आले. कर्ज स्वरुपात कोट्यवधी रुपयांचे कर्ज पोपट बोल्हाजी ढवळे याच्यासह त्याचा मुलगा सागर पोपट ढवळे, सतीष अशोक जामदार, अनिल शामराव कणसे, संजय दळवी, विलास शितोळे यांच्यासह १८ कर्मचार्‍यांच्या नावाने राजे शिवाजी आणि गोरेश्वर या पतसंस्थांचे कर्ज उचलण्यात आले. या शिक्षण संस्थेचे राजेंद्र नागवडे हे पदाधिकारी आहेत. या कर्मचार्‍यांच्या पगारातून वसुली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही राजेंद्र नागवडे हे त्या कर्मचार्‍यांचे पगार कपात होऊ देत नसल्याचा आरोप ठेवीदार संघर्ष समितीने केला आहे.

वाडेबोल्हाईतील नागवडेंंचा सातबारा
उतारा म्हणजे फक्त हिमनगाचे टोक!
हवेली (पुणे) तालुक्यातील वाडेबोल्हाई या गावात गट नं. ४६ मध्ये पोपट ढवळे, सागर ढवळे, राजेंद्र शिवाजीराव नागवडे, अजित बाळासाहेब अवताडे, संदेश आव्हाळे,संतोष काळे, रेखा अवताडे यांची नावे असणारे ८ हेक्टर ८४ आर क्षेत्र असणारा सातबारा उतारा आहे. या एकाच मालमत्तेवर पारनेरमधील तीन पतसंस्थांकडून ८० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. हे कर्ज घेताना पोपट ढवळे हाच मास्टरमाईंड राहिला. त्याने चार- चार दिवसाच्या फरकाने पंधरा दिवसात या पतसंस्थांकडून ८० कोटी घेतले. पहिल्या पतसंस्थेचा बोजा चढण्याआधी दुसरीचे कर्ज आणि पहिल्या आणि दुसर्‍या पतसंस्थेचे बोजा चढविण्याचे पत्र येण्याआधी तिसर्‍या पतसंस्थेचे कर्ज घेतले गेले. पतसंस्थांना मोठ्या प्रमाणात गंडवले गल्याचे लक्षात येताच यातील एका पतसंस्थेने राजेंद्र नागवडे यांच्या या क्षेत्रावर जप्ती आदेश घेतला आणि ८५ लाख २७ हजार ४०३ रुपयांचा बोजा चढविला. पतसंस्थेने राजेंद्र नागवडे यांची सदरची जमिन न्यायालयाच्या आदेशाने जप्त केली. त्यानुसार वाडेबोल्हाई येथील तलाठ्याने २२ ऑस्टोबर २०२४ रोजी त्याच्या सहीने फेरफाराच्या नोंदवहित त्याची नोंद घेतली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सत्तरीतील वाघाचं सोमवारी आमदारीकीतील शेवटचं भाषण!; पाचपुते काय बोलतात याकडे लागले सर्वांचेच लक्ष

  काष्टीच्या भैरवनाथ चौकात बबनराव पाचपुते यांची जाहीर सभा श्रीगोंदा / नगर सह्याद्री - बबनराव पाचपुते! वय...

पारनेरमध्ये २०१४ चा श्रीगोंदा पॅटर्न; पवार-विखे यांनी केले सूचक विधान… 

  उपमुख्यमंत्री अजित पवार | अपक्ष उमेदवार विजय औटी यांचे शक्तीप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार काशीनाथ...

झुंडशाही अन् दबंगगीरीने गावागावात कलह; तुम्हीच ठरवा, एकाधिकारशाही हवी की लोकशाही, काशिनाथ दाते काय म्हणाले…

मतदारसंघात विकास कामांच्या जोडीने शांतता नांदावी, द्वेष-मत्सर कमी व्हावा आणि सलोख्याचे वातावरण कायम राहण्याची...

कर्डिलेंचा तनपुरेंवर हल्लाबोल; त्यावेळी का बोलले नाही… काय म्हणाले पहा…

कोरोना काळासह त्यानंतर दूध अनुदानाबाबत का बोलले नाही अन् अनुदान का दिले नाही? दूधभावाचा...