spot_img
ब्रेकिंगखातेवाटप जाहीर! महाराष्ट्रातील सहा शिलेदारांना मंत्रिपद; कुणाला कोणतं खातं? पहा एका क्लिकवर..

खातेवाटप जाहीर! महाराष्ट्रातील सहा शिलेदारांना मंत्रिपद; कुणाला कोणतं खातं? पहा एका क्लिकवर..

spot_img

मुंबई नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) बहुमताचा आकडा पार केल्यानं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालंय. या नव्या सरकारचा शपथविधी ९ जून २०२४ रोजी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या सहा शिलेदारांनी देखील शपथ घेतली आहे.

तर १० जून २०२४ एनडीए सरकारच्या पर्वाला सुरुवात झाली. तसेच पहिली मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडली. या बैठकीत मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे.तर एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातील अनेक जुन्या चेहऱ्यांना पुन्हा त्याच मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीत. यात नितीन गडकरी, निर्मला सीतारमन, अमित शहा, राजनाथ सिंह यांना जुन्या मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे.

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांना देखील मंत्रिपदे देण्यात आली आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा रस्ते वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. तर राजनाथ सिंह यांना पुन्हा एकदा संरक्षण मंत्री बनवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे राहणार आहे. नव्याने मंत्री झालेल्या शिवराज सिंह चौहान यांना कृषी मंत्रालय देण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्याकडे वाणिज्य खातं देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांची खाती

1 नितीन गडकरी
मतदारसंघ – नागपूर
जन्म २७ मे १९५७
शिक्षण – एम. कॉम., एलएल. बी., डी. बी. एम.
कॅबिनेट- परिवहन आणि रस्ते कॅबिनेट मंत्री

2 पीयूष गोयल
मतदारसंघ – मुंबई उत्तर
जन्म १३ जून १९६४
शिक्षण – चार्टर्ड अकाउंटंट, एलएल. बी.
कॅबिनेट- वाणिज्य आणि उद्योग कॅबिनेट मंत्री

3 रामदास आठवले
राज्यसभा सदस्य
जन्म – २५ डिसेंबर १९५९
शिक्षण – सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून शिक्षण
राज्यमंत्री – सामाजिक न्याय विभाग

4 प्रतापराव जाधव
मतदारसंघ – बुलढाणा
जन्म- २५ नोव्हेंबर १९६०
शिक्षण- बी. ए. द्वितीय वर्ष
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार- आयुष आणि आरोग्य विभाग

5 रक्षा खडसे
मतवार संघ – रावेर
जन्म-१३ मे १९८७
शिक्षण – बीएस्सी (संगणक)
राज्यमंत्री- क्रीडा आणि युवक कल्याण विभाग

6 मुरलीधर मोहोळ
मतदारसंघ – पुणे
जन्म – १ नोव्हेंबर १९७४
शिक्षण – बी.ए.
राज्यमंत्री- सहकार आणि नागरी उड्डाण विभाग

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...