अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मुलीच्या लग्नानंतर पित्याचे अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (24 डिसेंबर) घडली. कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील बाळासाहेब सूर्यवंशी यांची मुलगी वैष्णवी हीचा विवाह केदार जगताप यांच्यासोबत मिरजगाव येथील पाटील लॉन्स येथे मंगळवारी (24 डिसेंबर) दुपारी दोन वाजता झाला.
यानंतर वैष्णवी हिस सासरी जाण्यासाठी निरोप दिला. यावेळी बाळासाहेब सूर्यवंशी हे खूपच भावनिक झाले होते. स्वतःच्या मुलीला दुसऱ्याच्या घरी पाठवताना त्यांना दुःख अनावर झाले होते. मुलगी वैष्णवी तिच्यावर बाळासाहेब यांचे खूप प्रेम होते. त्यांनी अतिशय लाडामध्ये आणि प्रेमाने या मुलीला लहानाचे मोठे करून तिचा संभाळ केला होता.
आणि त्यानंतर बाळासाहेब सूर्यवंशी, नातेवाईक दिनेश सदाशिव कागदे (रा.इंदूर, मध्यप्रदेश) हे गुरवपिंपरी येथील घरी येत असताना त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. सदरच्या घटनेत दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.