spot_img
अहमदनगरपुणे महामार्गावर अपघात; बाप लेकाचा दुर्देवी मृत्यू

पुणे महामार्गावर अपघात; बाप लेकाचा दुर्देवी मृत्यू

spot_img

अहिल्यानगर । नगर सह्याद्री:-
पुणे महामार्गावर मंगळवारी रात्री चारचाकी व दुचाकीचा अपघात होऊन राहुरी येथील बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. मनोज हरीभाऊ रासने व सुजल मनोज रासने (रा, मेहत्रे मळा, स्टेशन रोड, राहुरी) असे मयत पिता-पुत्राचे नाव आहे.

आधी माहिती अशी, मयत मनोज हरीभाऊ रासने व त्यांचा मुलगा सुजल मनोज रासने हे मंगळवारी रात्री अहिल्यानगर पुणे माहामार्गावरुन दुचाकीने पुण्याकडून नगरच्या दिशेने येत असताना जातेगाव फाटा येथे अहिल्यानगर कडून जाणाऱ्या एक टेम्पो त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातामध्य दोन्ही बापलेक जबर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे अमलदार संदीप चौधरी यांनी घटनास्थळी दाखल झाले.दोन्ही जखमींना सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केले. सदर घटनेचा पुढील तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...