spot_img
अहमदनगरनगर-पुणे महामार्गावरअपघात; चालकासह आठ जण..

नगर-पुणे महामार्गावरअपघात; चालकासह आठ जण..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात एसटी बस ट्रेलरवर आदळून झालेल्या अपघातात बस चालकासह आठ जण जखमी झाले आहेत. भारत पेट्रोल पंपासमोर रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी बस चालकाविरूध्द सोमवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश प्रकाश सोनवणे (वय 36 रा. शिरूर, ता. अंमळनेर, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचे नाव आहे.

ट्रेलरचा चालक समसाद खान (वय 40 रा. छत्तीसगढ) याने फिर्याद दिली आहे. बंडु शांतराम पवार (वय 28), पुजा बंडु पवार (वय 25), आर्यन बंडु पवार (वय 2, सर्व रा. खडकी ता. चाळीसगाव, जि. जळगाव), लक्ष्मीबाई धोंडु पाटील (वय 75 रा. पारोळा, ता. जि. जळगाव), फामिता बाबुमियाँ जहागिरदार (वय 70 रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर), आयशा शाकिर सय्यद (वय 30), अफजल शाकिर सय्यद (वय 9, दोघे रा. हडपसर, पुणे) व बस चालक उमेश सोनवणे (वय 36) हे जखमी झाले आहेत.

उमेश सोनवणे हा त्याच्या ताब्यातील अंमळनेर ते पुणे जाणारी एसटी बस (एमएच 20 बीएल 2401) घेऊन अहिल्यानगर- पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना चास शिवारात भारत पेट्रोलपंपा जवळ बसने पुढे जाणाऱ्या ट्रेलरला (सीजी 07 सीए 6138) धडक दिली. या धडकेत बस चालकासह आठ जण जखमी झाले असून दोन्ही वाहनाचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार ए. डी. झावरे करत आहेत.

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....