spot_img
अहमदनगरनगर-मनमाड महामार्गावर अपघात; स्कूल बसवर मालवाहतूक ट्रक पलटी!

नगर-मनमाड महामार्गावर अपघात; स्कूल बसवर मालवाहतूक ट्रक पलटी!

spot_img

Accident News: नगर-मनमाड महामार्गावर काल रात्री सुमारे ८ वाजता राहुरी शहरात एक गंभीर अपघात घडला. कापसाच्या गाठी घेऊन जाणारा मालवाहतूक ट्रक (क्र. RJ 19 GE 8922) गतिरोधकावर आदळून पलटी झाला आणि शिर्डीच्या स्कूल बसवर (क्र. MH 17 CV 5191) आडवा झाला. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती असून, पुढील चौकशी राहुरी पोलीस करत आहेत.

घटनास्थळी साई निर्माण स्कूल व ज्युनिअर कॉलेजची बस ट्रकला ओव्हरटेक करत असताना ट्रक अचानक पलटी झाला. बसमध्ये चालक आकाश कोते यांच्यासह चार ते पाच कर्मचारी होते. प्रसंगावधान राखत त्यांनी तातडीने बसच्या दुसऱ्या बाजूला उडी घेतल्याने सर्वजण बालंबाल बचावले. मात्र, स्कूल बसचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघात घडताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ट्रक व बस महामार्गावर अडथळा ठरत असल्याने दोन क्रेनच्या सहाय्याने वाहनांना बाजूला काढण्यात आले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री १० वाजता वाहने मार्गावरून हलवण्यात यश आले. या दरम्यान, नगर-मनमाड महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांसह स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेतला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये बंद घर फोडले; अडीच लाखांचे दागिने लांबविले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - श्रीकृष्णनगर, केडगाव येथील प्लॉट क्रमांक ३० येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी...

धक्कादायक; बँक कर्मचार्‍याने १२ तोळे सोने लांबविले, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : नगरमध्ये बँक कर्मचार्‍यांने १२ तोळे सोने लंपास केल्याची प्रकार उघडकीस...

दोन लेकरांसह आईची विहिरीत उडी; तिघांचाही मृत्यू, नगरमधील घटना

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना जामखेड | नगर सह्याद्री रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव...

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...