अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
चाँदबीबी घाटातील धोकादायक वळणावर पाथर्डीकडून नगरकडे जात असलेली बस उलटली. नवी कोरी एसटी बस उलटल्याने या नव्या एसटी बसचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातामध्ये जीवितहानी टळली आहे.
कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील चाँदबिबी महालाजवळ शुक्रवार दि.०७ रोजी पहाटेच्या सुमारास अपघात घडला. चाँदबीबी महाल हा घाट परिसर असून, या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणाचा वाहन चालकांना अंदाज येत नाही, त्यामुळे या ठिकाणी हमखासपणे अपघात होतात.
पाथर्डी कडून नगरकडे जाताना चाँदबीबी महालाजवळील या धोकादायक वळणामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून होणारे अपघात टाळावे. तसेच मेहेकरी फाटा या ठिकाणी महामार्गावर अरुंद पूल असून, या अरुंद पुलामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत.या अरुंद पुलाची दुरुस्ती करून या ठिकाणी नव्याने रुंद व उंच पूल उभारण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.