spot_img
अहमदनगरसीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अॅक्सेस स्वतःकडे घेतले, डॉक्टर महिलेसोबत नको तोच प्रकार घडला? २८...

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अॅक्सेस स्वतःकडे घेतले, डॉक्टर महिलेसोबत नको तोच प्रकार घडला? २८ वर्षांच्या तरुणांवर गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
डॉक्टर असलेल्या महिलेच्या घरातील हॉलमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अॅक्सेस तरुणाने स्वतःकडे घेऊन त्यांची बदनामी करून गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. उपनगरात राहत असलेल्या पीडित महिला डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर नंदकिशोर वाव्हळ (वय २८ रा. शास्त्रीनगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

फिर्यादी यांनी त्यांच्या पतीपासून घटस्फोट घेतला असल्याने त्या मुलासह उपनगरात राहतात. त्यांचे उपनगरातच भाडोत्री गाळ्यामध्ये क्लिनीक आहे. मागील एक वर्षापूर्वी (सन २०२३) फिर्यादी त्यांच्या क्लिनीकवरून घरी जात असताना मयुरने त्यांचा पाठलाग केला होता व तुमच्यावर प्रेम असल्याचे बोलला होता. त्यावेळी फिर्यादीने त्याला जाब विचारला असता त्याने त्यांना शिवीगाळ केली होती. तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये त्याने एकाव्यक्तीबरोबर फिर्यादीचे प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्यांची बदनामी केली होती.

२९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री नऊच्या सुमारास मयुर हा फिर्यादीच्या क्लिनीकमध्ये आला व मोबाईलमध्ये त्याने त्याच्या फिर्यादीच्या घरातील हॉलमध्ये बसविलेल्या कॅमेऱ्याचे अॅक्सेस दाखविले व मला तु घरात काय करते हे सर्व दिसते असे म्हणाला यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर...

राणीताई लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; महायुतीत एकमत होईना

तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता गणेश जगदाळे | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. पारनेर...

पवारांच्या नातवाकडून कर्जत-जामखेडकरांचा भ्रमनिरास; रोहित पवारांविरोधात तरुणाई देखील एकवटली

साधा माणूस म्हणून राम शिंदेंचा मार्ग झाला अधिक सुकर कर्जत | नगर सह्याद्री पवारांचा नातू म्हणून...

जागावाटपाआधीच आघाडीत बिघाडी; काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा अर्ज…

मुंबई / नगर सह्याद्री - महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. कोणती...