spot_img
अहमदनगरआधी संविधान मान्य करा, नसता...!

आधी संविधान मान्य करा, नसता…!

spot_img

आमदार संग्राम जगताप कडाडले | मुस्लिम विरोधी नव्हे तर त्यांच्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधात लढत राहणार
थेट भेट / शिवाजी शिर्के
लोकशाही आणि संवीधान माननारा मी कार्यकर्ता आहे. सर्व समाज आणि समाजातील घटक गुण्यागोविंदाने नांदलेच पाहिजेत. मात्र, काही अपप्रवृत्तींना सिरीया संस्कृती येथे आणायची आहे, त्यांना आपल्या देशाचे संवीधान मान्य नाही. जर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संवीधान मान्य नसेल तर त्यांना या देशात राहण्याचा काहीच अधिकार नाही. त्यांनी सरळ बांगलादेश, पाकिस्तानचा पर्याय निवडावा. या देशाचे संवीधान आणि त्यानुसार तयार झालेल्या कायद्यांचे पालन करणार्‍यांचा आम्ही आदरच केला आहे. यापुढेही करणार! मात्र, हे संवीधान मान्य नसेल तर त्यांच्या विरोधात आपण आक्रमक राहणार म्हणजे राहणार! मुस्लिम विरोधी माझी भूमिका असण्याचे कारणच नाही. त्यांच्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधात, सिरीया माननार्‍यांच्या विरोधात मी माझी लढाई लढत राहणार अशी स्पष्ट भूमिका अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी ‘नगर सह्याद्री’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये मांडली.

मला बोलावले गेले तर मी जाणारच!
हिंदू धर्मियांच्या देव- देवस्थानांचे अनेक प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालीत. काही देवस्थानांवर ताबाच घातला गेलाय. काही देवस्थानांच्या जमिनीच ताब्यात घेतल्यात! याबाबत नगर शहरासह जिल्ह्यातून आणि संपूर्ण राज्यातून तक्रारींचा पाऊस माझ्याकडे पडत आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांच्या प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे आहे. त्यानुसार मी त्या- त्या प्रश्नांची दखल घेतो आणि त्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन वास्तव समजून घेतो. त्यात गैर काहीच नाही. मला बोलावणे आले तर मी राज्यातच काय देशात कुठेही जाणार! शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान श्रेष्ठ आहे हे सांगावेच लागणार आहे

हिंदुत्वाचा अजेंडा जुनाच, त्यात नवीन काहीच नाही!
हिंदुत्वाचा माझा अजेंडा हा जुनाच आहे. अमरनाथ यात्रेकरुंवर भ्याड हल्ला झाला, त्यावेळी प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोर्चा काढला होता. त्या मोर्चात ही माझी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर मी आमदार झालो. त्यामुळे मी आत्ताच हिंदुत्वाचा अजेंडा घेतला असे म्हणण्यात कोणताच अर्थ नाही.

तुमचे लाड का करायचे?
आमच्याकडून गुण्यागोविंदाने नांदण्याची अपेक्षा ठेवताना तुम्ही तुमच्या भागात राहणार्‍या आमच्या समाजाशी कसे वागता हे एकदा तपासून पाहा! हिंदू बांधवांना तेथे होणारा त्रास आणि त्याठिकाणाहून हुसकावून लावण्यापर्यंतच्या घटना माझ्याकडे पुराव्यानिशी आहेत. आमच्या बांधवांना जर जाणिवपूर्वक त्रास देणार असाल तर आम्ही तुमचे लाड का करायचे, असा प्रतीप्रश्न आ. संग्राम जगताप यांनी उपस्थित केला.

अजितदादांचाच मी कार्यकर्ता, त्यांच्याशी…?
आमचे नेते अजित दादा पवार यांच्यासह आमच्या पक्षाची भूमिका ही नक्कीच सेक्युलर आहे. मात्र, सिरीया धार्जिणी नक्कीच नाही. दादांचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि ती कायम राहणार आहे. त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांना माझी भूमिका मी सांगितली आहे. त्यांच्या मनात माझ्याबद्दल कोणताच गैरसमज नाही. त्यांच्याच विचारधारेवर आणि संविधानाच्या भूमिकेवर आम्ही काम करत आलो आहोत आणि काम करत राहणार आहोत.

आमदार संग्राम जगताप यांची सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...