spot_img
तंत्रज्ञानमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कुणाला?, कसा असणार फॉर्म्युला? पुन्हा अडीच वर्षं की पाच...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कुणाला?, कसा असणार फॉर्म्युला? पुन्हा अडीच वर्षं की पाच वर्षं, वाचा सविस्तर

spot_img

Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. या लढतीत महायुतीने महाविकासआघाडीचा सुपडा साफ केला आहे. विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे.

आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्रि‍पदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता वाढली आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन महयुतीतही धुसफूस असल्याचे पाहायला मिळत होते. आता महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यातच भाजपचे १३२ आमदार निवडून आल्याने भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर भाजपात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून 2 निरीक्षक पाठवले जाणार आहेत. केंद्रीय भाजपकडून 2 निरीक्षक राज्यात पाठवले जाणार आहेत. विधीमंडळ नेता निवडीनंतरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही मोठ्या हालचाली घडत आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे.महायुतीच्या तिन्हीही पक्षांचे नेते दिल्लीत जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावर चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर भाजपचे दिल्लीतील नेते कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डोनाल्ड टॅम्प यांनी फोडला टॅरिफ बॉम्ब, शेअर बाजारात भूकंप, घडले असे…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली...

सोलापूर हादरलं! थायलंडच्या भूकंपानंतर महाराष्ट्रातही 3 ठिकाणी धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सोलापूर / नगर सह्याद्री - गेल्या आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांमध्ये...

खडकी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; विद्यार्थ्यांचे ‘मिशन आरंभ’मध्ये उतुंग यश

खडकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम सुनील चोभे | नगर सह्याद्री जिल्हा परिषद...

डुप्लिकेट चावीची कमाल, चार लाख छूमंतरल; नगरमध्ये घडलं असं काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून आत प्रवेश करत 11 तोळे आठ...