spot_img
अहमदनगरसंगमेरच्या नराधमाला कोर्टाची मोठी शिक्षा! नेमकं प्रकरण काय? पहा..

संगमेरच्या नराधमाला कोर्टाची मोठी शिक्षा! नेमकं प्रकरण काय? पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करणार्‍या आरोपीला येथील विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी २० वर्षे सक्तमजुरी व नऊ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रकाश बाबुराव कडूसकर (वय ४१ रा. डोंगरवाडी, ता. पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून वैशाली राहुल राऊत यांनी काम पाहिले.

मार्च २०२२ पासून ते १३ जुलै २०२२ रोजी रात्री साडेसात वाजेपर्यंत वेळोवेळी पारनेर तालुयातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या घराजवळ असलेल्या तळ्याकाठी तिला प्रकाश कडूसकर याने खाऊ देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. तेथे तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. झालेला प्रकार घरच्यांना सांगितला तर आई-वडिलांचा गुपचूप काटा काढील, त्यांना जिवे मारील अशी धमकी दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीने पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा संपूर्ण तपास सहा. पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी तसेच पीडित मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात ग्रामसेवक यांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३७६ (३) नुसार २० वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंड, भादंवि कलम ५०६ (२) नुसार एक वर्षे सक्त मजुरी व एक हजार रूपये दंड, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ८ नुसार ३ वर्षे सक्त मजुरी व तीन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार आडसुळ, एस. एन. बडे यांनी सहकार्य केले.

सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील राऊत यांनी युक्तीवाद केला की, पीडित मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ १५ वर्षे १० महिन्याची होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांच्या मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. त्यामुळे आरोपीला या केसमध्ये निर्दोष सोडले तर समाजातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून अल्पवयीन मुलांवर अशा घटना पुन्हा-पुन्हा होण्याची शयता नाकारता येत नाही. तसेच वय वर्षे १५ वर्षे १० महिने असलेली मुलगी ही आरोपी विरूध्द काहीही कारण नसताना खोटे का सांगेल? त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी, असा युक्तीवाद केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...