spot_img
ब्रेकिंगदोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार; नागरिकांकडून शाळेची तोडफोड, कुठे घडली घटना?

दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार; नागरिकांकडून शाळेची तोडफोड, कुठे घडली घटना?

spot_img

ठाणे | नगर सह्याद्री:-
कोलकतामधील हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉटरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी देशभरात संतापाची लाट पसरली आहे. यातच बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमधील बदलापूरमध्ये एका नमांकित शाळेत झालेल्या संतापजनक घटनेबाबत जनता रस्त्यावर उतरली.

जनतेकडून तीव्र निदर्शने करण्यात आली असून बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्याचदरम्यान, ज्या शाळेत ही घटना घडली होती. त्या शाळेत संतप्त जमावाने तोडफोड केली. या शाळेची तोडफोड करण्यामध्ये महिला आंदोलकही सहभागी आहेत. त्याचदरम्यान, आंदोलनकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन येथे दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे.

या दगडफेकीत काही महिलांना दुखापत झाली आहे. तसेच काही पोलीसही जखमी झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनाला आता हिंसक वळण लागत आहे. शाळेच्या आत काही आंदोलक शिरले आहेत. पोलिसांकडून शाळेमध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. बदलापुरात या घटेनमुळे अतिशय उद्रेक झाला आहे. पोलिसांना आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, आंदोलक हे ऐकण्याच्या भुमिकेत दिसत नाहीय. शाळा परिसरात आता आंदोलकांची धरपकड सुरु झाली आहे.

आंदोलाममुळे सकाळी साडेनऊ वाजेपासून बदलापूर ते कर्जत दरम्यान लोकल सेवा ठप्प झाली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर देखील पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाच्या विरोधात पालक तसेच आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, दोन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो कंत्राटदारामार्फत शाळेत सफाईचे काम करत होता.

काय आहे प्रकरण?
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. सफाई कर्मचार्‍यानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी घडली. त्यानंतर मुलींच्या पालकांनी याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास १२ तास लावले, असा आरोप पालकांनी केला होता. या प्रकरणी शाळेने माफीनामा दिला आहे.

एसआयटी गठित करण्याचे आदेश
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, अन्यथा… आज कुणाच्या राशीत काय?

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन...

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...