spot_img
अहमदनगरखडकवाडी ग्रामसभेत सरपंच-ग्रामसेवकांचा पळपुटेपणा!

खडकवाडी ग्रामसभेत सरपंच-ग्रामसेवकांचा पळपुटेपणा!

spot_img

गावकऱ्यांनी मागितला हिशोब, सरपंच-ग्रामसेवकांनी टाळली उत्तरे, आंदोलन भडकले

पारनेर / नगर सह्याद्री:
खडकवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा शिंदे आणि ग्रामसेवक श्री. अडसूळ यांनी ग्रामसभेत गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी थेट ग्रामसभा बंद करून पळ काढला. गावकऱ्यांनी गावातील विकासकामांबाबत स्पष्ट माहिती मागितली, पण सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांना उत्तरे देणे टाळले. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोर बैठे आंदोलन सुरू केले आहे.

ग्रामसभेत गावकऱ्यांनी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत झालेल्या कामांचा तपशील, प्रशासकीय मान्यता आणि बिलं मागितली. जल जीवन मिशन योजनेची सध्याची स्थिती, आर्थिक नियोजन आणि खर्च झालेल्या निधीची माहितीही विचारली. याशिवाय, ग्रामसेवकांच्या हालचालींचे हजेरीपत्रक, घरकुल यादी, गावातील पाईपलाईन दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत झालेला खर्च, रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेली कामे आणि निधीचा तपशील, तसेच गावात लावलेल्या पददिव्यांच्या परवानगीची माहिती मागितली. पण या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरपंच शोभा शिंदे यांनी ग्रामसभा संपवली आणि ग्रामसेवकांसह तिथून निघून गेले. गावकऱ्यांनी याला पारदर्शकतेचा अभाव आणि गैरकारभाराचा प्रकार मानला.
या घटनेनंतर गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन सुरू केले. यावेळी डॉ. किशोर उर्फ बाबासाहेब ढोकळे, विकास रोकडे, अमोल रोकडे, संतोष शिंदे, किरण वाबळे, अरुण गागरे, योगेश शिंदे, साबाजी गागरे, भाऊसाहेब गागरे, सखाराम नवले, धनंजय ढोकळे, अमोल म्हस्के, वैभव चौधरी, जनार्धन बोबडे, तुषार शिंदे, आदित्य दळवी, देविदास साळुंके, अशोक गागरे, सुरेश ढोकळे, अंकुश गागरे, आण्णा घेमुड, पांडुरंग रोहकले, काशिनाथ रोहकले, प्रसाद कर्णावट, प्रदीप ढोकळे, शिवाजी रोकडे, पोपट हुलावळे, गणेश चौधरी, आंबदास नवले, संपत हुलावळे, सागर शिंगोटे, अजिंक्य ढोकळे, अभिजित गागरे यांच्यासह अनेक गावकरी आंदोलनात सहभागी झाले. गावकऱ्यांचा आरोप आहे की, सरपंच आणि ग्रामसेवक गावाच्या पैशांचा हिशेब देण्यास टाळाटाळ करत आहेत. पारदर्शकता नसल्याने गावातील विकासकामे रखडली आहेत.
गावकरी आता ठाम आहेत की, जोपर्यंत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आणि विकासकामांचा हिशेब स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ग्रामपंचायतीच्या या गैरप्रकारांमुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.

गेल्या पाच वर्षांमध्ये खडकवाडी ग्रामपंचायत च्या माध्यमातून मोठा निधी विकास कामांवर व जन सुविधांवर खर्च झाला आहे या सर्व खर्चाचा तपशील ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामसेवकांकडे मागितला तर त्यांनी ग्रामसभे मधून काढता पाया घेतला ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाच्या निधीचा सर्व तपशील देण्यात यावा.
डॉ. किशोर उर्फ बाबासाहेब ढोकळे (खडकवाडी)

ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या सर्व विषयांसंबंधातील माहिती ज्या ग्रामस्थांना पाहिजे त्यांनी ग्रामपंचायतकडे पत्र व्यवहार करावा त्यांना अपेक्षित असलेली सर्व माहिती खडकवाडी ग्रामपंचायत देण्यास तयार आहे.
शोभा शिंदे (सरपंच खडकवाडी)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लावरे तो व्हिडिओने घुलेवाडी षडयंत्राचा पर्दाफाश; माजी मंत्री थोरात म्हणाले, आता बंदोबस्त कर..

संगमनेर ।नगर सहयाद्री:- राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम...

चौकशी अहवालातून पर्दाफाश; अहिल्यानगर मधील ‘ती’ शाळा बनावट

राहाता | नगर सह्याद्री:- शिर्डी (ता. राहाता) इकरा उर्दू शाळा, पुनमनगर येथील चार शिक्षकांना सन...

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांची चौकशी करा; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कोणी केली मागणी?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अल्पसंख्याक संस्थांकडून पाठविण्यात येणार्‍या शिक्षणसेवकांच्या प्रस्तावांना जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर...

मुख्यमंत्र्यांना धाडली नोटीस! संदीप थोरातसह संचालकांवर कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करणार; कोणी दिला इशारा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड, अहिल्यानगर या संस्थेचे चेअरमन संदिप सुधाकर थोरात...