spot_img
अहमदनगरफरार चेअरमनला 9 महिन्यानंतर बेड्या!; 'या' मल्टीस्टेट‌ मधील गाजलेले घोटाळा प्रकरण

फरार चेअरमनला 9 महिन्यानंतर बेड्या!; ‘या’ मल्टीस्टेट‌ मधील गाजलेले घोटाळा प्रकरण

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
‌‘ध्येय मल्टीस्टेट‌’चा व्हाईस चेअरमन रोहिदास कवडेला 9 महिन्यानंतर बेड्या ठोकण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. नगर शहरासह जिल्ह्यात ‌‘ध्येय मल्टीस्टेट‌’च्या शाखा सुरु करून ठेवीदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या. त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या दाखल गुन्ह्यातील महत्वाचा आरोपी आणि ‌’ध्येय‌’ चा व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी) आहे. त्याला मुंबईच्या बदलापुर येथून बुधवारी (दि.26) रात्री ताब्यात घेण्यात आले आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‌‘ध्येय मल्टीस्टेट‌’च्या शाखा सुरु करून जादा परतावा देण्यारचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता सर्व शाखा बंद करून 112 ठेवीदारांचे 5 कोटी 78 लाख 65 हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेचा चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी ता. नगर) यांच्या सह 4 संचालक अशा 7 जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात दि. 16 मे 2024 रोजी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या 9 महिन्यापासून सर्व आरोपी फरार झालेले होते. यातील 2 संचालकांना न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केलेला आहे. तर इतर 5 जण मोकाट होते. त्यामुळे ठेवीदारांमध्ये पोलिस तपासाबाबत तीव्र नाराजी पसरलेली होती. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी असलेले तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना या गुन्ह्यातील 2 नंबरचा आरोपी रोहिदास कवडे हा मुंबईतील बदलापूर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी पोलिस अंमलदार दत्तात्रय जपे, सुधीर खाडे, योगेश चव्हाण, बाळासाहेब भापसे सुनिल शिरसाठ यांचे पथक त्याला पकडण्यासाठी पाठवले. या पथकाने बदलापूर येथे जावून कवडेचा शोध घेत बुधवारी रात्री त्याला ताब्यात घेतले. त्याला पहाटे नगरमध्ये आणण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे पाटलांनी शब्द पाळला! साकळाई योजनेचा मार्ग मोकळा; लाभधारक शेतकर्‍यांमध्ये आनंदोत्सव

घोड प्रकल्पाच्या फेर जल नियोजनास शासनाची मंजुरी सुनील चोभे / नगर सह्याद्री पुणे जिल्ह्यातील शिरूर...

महाराष्ट्रावर नवं संकट; अतिमुसळधार पावसाचा इशारा, आयएमडीकडून 9 जिल्ह्यांना हायअलर्ट

मुंबई / नगर सह्याद्री - देशात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात...

सरपंचापाठोपाठ माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या; कुठे घडला प्रकार पहा

जळगाव / नगर सह्याद्री - जळगावमध्ये माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जळगावजवळील...

सुपा एमआयडीसीत स्थानिकांवर अन्याय!; आ. काशीनाथ दाते यांनी वेधले लक्ष

टाकळी ढोकेश्वर परिसरात विस्तारीत एमआयडीसीची गरज अहिल्यानगर | नगर सह्याद्री पारनेर मतदारसंघामध्ये सुपा एमआयडीसी अतिशय चांगल्या...