spot_img
अहमदनगरआमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटलांचे मोठे विधान; लीड बद्दल...

आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटलांचे मोठे विधान; लीड बद्दल नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

महायुतीची घटक पक्षाची बैठक संपन्न
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांनी पुन्हा एकदा संग्राम जगताप यांना आमदार करण्याचा संकल्प केला आहे. आ.जगताप यांच्यासाठी चांगले वातावरण असल्याने नगर शहरातील निवडणूक संपल्यातच जमा आहे. राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे असे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव जरी झाला असला तरी नगर शहरातून मोठा लीड मला मिळाला. त्यासाठी संग्राम जगताप यांनी प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने काम केले. आता अशीच ताकद सर्वांनी मिळून महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभी करून त्यांना माझ्यापेक्षा अधिक लीड देवून विजयी करा हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे, असे आवाहन माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.

महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी सोमवारी सायंकाळी नगर शहरात महायुतीतील घातक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी डॉ.विखे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजप सरचिटणीस सचिन पारखी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेंद्र गांधी, शहर प्रमुख सचिन जाधव, माजी नगरसेवक धनंजय जाधव, आरपीआयचे नेते अजय साळवे, सुरेश बनसोडे, अरविंद शिंदे, रेश्मा आठरे, अंजली आढाव, गीता गिल्डा, प्रिया जानवे, सुरेखा विद्ये, नितीन शेलार, पोपट पाथरे आदींसह मोठ्या संख्येने महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी डॉ.विखे पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीची २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून २४ तारखेला माझा वाढदिवस आहे. या वाढदिवसाची भेट मला आ.संग्राम जगताप यांना ५० हजाराहून अधिक मताधिक्याची सर्वांनी द्यावी. निवडणुकीतील विरोधकांचे काहीच अस्तित्व नाहीये. त्यांची संघटना एका खोलीत मावणारी आहे. पण आमची महायुती हे विशाल आहे. महायुतीचे नेते देवेंद्र फडविसांच्या आदेशाला आम्ही बांधील असून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडणून आणण्यासाठीही आम्ही कटीबद्ध आहोत. या निवडणुकीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अस्तित्व दाखवून जास्तीत जास्त लीड आ.जगतापांना द्यावा. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यावर नगरची नवी एमआयडीसी, नवे डीपी रस्ते, पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मारकाचे काम असे अनेक प्रलंबित कामे मी व आ.संग्राम जगताप मिळून करणार आहोत.

बैठकीच्या प्रस्ताविकात संपत बारस्कर म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरा पासून महायुतीमधील पक्षाचे पदाधिकारी पळत आहेत. यामध्ये भाजपाचे काम मोठे आहे. महायुतीमधील सर्व एकसंघाने, एकदिलाने आ.संग्राम जगताप यांचे काम करत आहेत. या निवडणुकी नंतर राज्यात पुन्हा महायुतीचेच राज्य येणार असून संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा निवडून येत मंत्रीही होतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वांबोरीचा कारखाना सहकारी केल्यास मी पाठींबा द्यायला तयार ; कर्डिले यांचे रोखठोक मुलाखतीत तनपुरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र

छत्रपती शिवरायांचं नाव हातोड्याने तोडून आजोबाचं नाव दिलं! तो कारखाना बंद पाडून बापाच्या नावानं...

विजयाची फुले पवारांना अर्पण करणार ः प्रणोती जगताप

राहुल जगताप यांच्यासाठी काष्टीत प्रचारफेरी श्रीगोंदा | नगर सह्याद्री महाविकास आघाडीच्या तिकिटाचे दावेदार राहुल जगताप हेच...

घराणेशाहीवर टीका करणार्‍यांची घरात पद घेण्यासाठी धडपड; दातेंची लंकेंवर टीका, काय म्हणाले पहा…

देवीभोयरे परिसरात प्रचारफेरी पारनेर | नगर सह्याद्री - राजकारण, समाजकारणात सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असून, पारनेर विधानसभा...

सेटलमेंट झाली की ते माघार घेतील अन् एकाला पाठींबा देतील!; विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत

श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत...