spot_img
महाराष्ट्र'उत्तीर्णची हॅटट्रीक करणाऱ्या अभिजित आहेर यांचा गावकऱ्यांकडून नागरी सत्कार'

‘उत्तीर्णची हॅटट्रीक करणाऱ्या अभिजित आहेर यांचा गावकऱ्यांकडून नागरी सत्कार’

spot_img

अभिजीतने पळसपुरचे नाव देशपातळीवर नेले: आ. दाते
युपीएससीत आयआरएस, आयआयबी आणि आयएफएस उत्तीर्णची हॅटट्रीक करणाऱ्या अभिजित आहेर यांचा गावकऱ्यांकडून नागरी सत्कार
पारनेर | नगर सह्याद्री
पळसपुरच्या मातीत जन्माला आलेल्या अभिजीत सहदेव आहेर या हिऱ्याने गावाचे नाव थेट देशपातळीवर नेऊन आपल्या तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. आजोबा कोंडीभाऊ आहेर हे गावातील पहिले प्राथमिक शिक्षक तर आई- वडिल प्राध्यापक. चांगल्या सुसंस्कृत घरात चांगले संस्कार मिळाले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्राध्यापक म्हणून काम करत असताना व चांगल्या पगाराची नोकरी असताना प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अभिजीतने चांगले यश संपादन केले. आयआरएस, आयआयबी आणि आयएफएस अशा तीन सलग परीक्षांमध्ये यश संपादन करताना अभिजीत याला त्याच्या बहिणीची म्हणजेच श्रद्धा हिचं पाठबळ प्रोत्साहन देत गेले. त्यातूनच त्याने आई वडिलांसह आपल्या गावचे, मातीचे आणि तालुक्याचा झेंडा देशपातळीवर फडकवला असल्याचे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.

पळसपुर गावचे सुपुत्र कु. अभिजित सहदेव आहेर यांनी केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परिक्षेत भारतीय वनसेवा (आयएफएस 114), भारतीय महसुल सेवा (आयआरएस 734 ), भारतीय गुत्पचर विभाग (इंटीलीजन्स ब्युरो, आयबी) या तीन प्रतिष्ठित शासकीय परीक्षांमध्ये यश मिळविल्याबद्दल त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यश संपादन केलेल्या अभिजीत आहेर याचा त्याच्या गावच्या मातीत गावकऱ्यांनी नागरी सत्कार केला. या सत्कार कार्यक्रमाच्या आधी त्याची गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे विश्वस्त सिताराम अण्णा खिलारी, भाजप प्रदेश कमिटिचे सदस्य विश्वनाथ दादा कोरडे, वसंतराव चेडे, सुभाषराव दुधाडे, शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले, संभाजी औटी यांच्यासह पळसपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊसाहेब आहेर सर, संजय धनवान आहेर, बाळासाहेब आहेर सर, श्री बाळासाहेब काकडे सर, बाळासाहेब बुधजी आहेर, बाबू शेठ आहेर, सतीश आहे, मयूर शिंदे, किसन आहेर गुरुजी, दिलीप शेठ आहेर, दिलीप काकडे सर, संपत आहेर सर, रामदास ढोले, नामदेव ढोले, गणेश शेठ आहेर, बाबाजी आहेर, भाऊसाहेब इंजिनियर, श्रीकांत वाघमारे, सुरेश आहेर,यांनी अथक प्रयत्न करुन कार्यक्रम यशस्वी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...