निघोज । नगर सहयाद्री
अभिजीत सहदेव आहेर यांची भारत सरकार गृह मंत्रालयाच्या गुप्तचर अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा निघोज ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे, संदीप पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुलिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर, प्रा. विजया ढवळे ( आहेर ) प्राध्यापिका रसाळ, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष भास्करराव कवाद, पत्रकार संदीप ईधाटे, पत्रकार सचिन जाधव, दत्ता ठुबे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार कवाद, वाघमारे आदिंची भाषने झाली.
भुषन वाटावे अशा पदावर निवड
अभिजीत आहेर यांची प्राचार्य आहेर व प्राध्यापिका ढवळे यांना भुषन वाटावे अशा पदावर निवड झाली आहे. अभिजीत आहेर यांनी उच्च पदावर कार्यरत राहून तालुक्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
– चित्राताई वराळ पाटील, सरपंच निघोज
जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब
अभिजित आहेर हे गुणवंत विद्यार्थी म्हणून प्रचलित होते. आई वडील यांचे मार्गदर्शन आणी जिद्द व चिकाटी यातून अभिजित यानी उच्च शिक्षण घेऊन तालुक्याचा नावलौकिक राज्यात केला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांना दिल्ली येथे काम करण्याची संधी मिळणार आहे ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असून अभिजीत यांचे आजोळ निघोज आहे.
-उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे