श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधून एक बातमी समोर आली आहे. बेलवंडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत बनावट नोटांचे घबाड हाती लागले आहे. याप्रकरणी संशयित अजय मधुकर पुरके (३०, रा. पिंपळगाव भासले, ता. आवर्ती जि. वर्धा) व अनिल रघुनाथ देसाई (३३, रा. यराडबाडी, ता. पाटण, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त: बेलबंडी पोलसांना गुप्त बातमीदारांकडून दौंड-नगर रोडवरील कोळगाव-घारगाव रोडवर अवैध दारुची व बनावट हत्याराची चोरटी बाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. बेलबंडी पोलसांनी एक पथक तयार करत कोळगाव शिवारात हॉटेल विश्वरत्न येथे सापळा रचला. रात्री आठ वाजेच्या सुमारास एका मोटार सायकलवर दोन संशयित व्यक्ती दौंडच्या बाजूने येताना दिसले.
त्यांना हात करून मोटारसायकल थांबविण्याचा इशारा केला असता, त्यांची गाडी घेऊन भरधाव वेगात निघून गेले. या मोटार सायकलचा सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांना काही अंतरावर पकडले.त्यांच्याकडील कापडी पिशवीची तपासणी केली असता त्यात मोठी रकम दिसून आली. परंतु यामध्ये एकच नंबरच्या ५ लाख ८० हजार रुपयांच्या या नोटा आढळल्या अधिक चौकशी करता या नोटा बनावट असून दोघांनी त्यांची छपाई केल्याची कबुली दिली.