बुलढाणा । नगर सहयाद्री:-
बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलंय. काही दिवसात ४० ते ५० लोकांना टक्कल पडलंय. नागरिकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. यानंतर काही दिवसात टक्कल पडत असल्याचं समोर आलंय.
शॅम्पू वापरणाऱ्या लोकांचे टक्कल पडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. पण ज्यांनी शॅम्पू कधीच वापरला नाहीय त्यांचीही अचानक केस गळती झाल्याचं दिसून येत आहे.
बोंडगाव, हिंगणा, कालवडसह तीन गावात टक्कल पडतंय. पुरुषांसह महिलांचाही यामध्ये समावेश आहे. शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास ५० हून अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होत आहे.
अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने रहिवाशी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तिन्ही गावातील अनेक व्यक्तीची केस एकाएकी कमी होऊन गळून जात आहेत.यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे.