नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
अलीकडेच सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती की, सोन्याची किंमत प्रति तोळा ५० हजार रूपयांपर्यंत पोहोचू शकते. पण गेल्या आठवड्यात याउलट झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. इंवेस्टमेंट बँकर गोल्डमॅन सॅक्सच्या रिपोर्टनुसार, १० ग्रॅम सोन्याची किंमत १.३६ लाखांपर्यंत पोहोचू शकते.
अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या ट्रेड वॉरमुळे, २०२५च्या अखेरीस सोन्याची किंमत वाढू शकते. प्रति आउंस ४,५०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.
सोन्याच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ
गोल्डमॅन सॅक्सच्या रिपोर्टनुसार,सोन्याच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. यामुळे मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याचे भाव प्रति आउंस डॉलर ३३०० वर पोहोचले आहे. तसेच सोन्याच्या भाव हा चढताच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गोल्ड ईटीएफचा दर किती?
गेल्या आठवड्यात गोल्ड ईटीएफने पहिल्यांदाच प्रति आउंस डॉलर ३२०० चा टप्पा ओलांडलेला आहे. जागतिक स्तरावर वाढणाऱ्या ट्रेड वॉरमुळे गोल्ड ईटीएफचा दर प्रति आउंस डॉलर ३२४५.६९ च्या पातळीवर पोहोचला होता. त्यामुळे सोन्याच्या भावातही वाढ झाली आहे.
आजचा सोन्याचा दर किती?
गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार, १४ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. २४ कॅरेट गोल्ड १० ग्रॅमवर १६० रूपयांची घट झाली आहे. म्हणजेच १ तोळं सोनं आज तुम्हाला ८७,७०० रूपयात मिळेल. तर, १०० ग्रॅम सोन्याची किंमत ९,५६,६०० रूपये इतकी आहे.