spot_img
ब्रेकिंगअबब! ६२ लाखांचा बनावट तांदूळ पकडला; नगरमध्ये चाललंय काय?

अबब! ६२ लाखांचा बनावट तांदूळ पकडला; नगरमध्ये चाललंय काय?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
येथील एमआयडीसी परिसरात बासमती तांदळाच्या नावाखाली बनावट तांदूळ तयार करून विक्री केला जात असल्याच्या प्रकाराचा अन्न व औषध प्रशासनाने भंडाफोड केला. सुमारे 62 लाख रूपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. सदर बनावट तांदळाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एमआयडीसी परिसरात बासमती तांदळाच्या नावाखाली बनावट तांदूळ तयार करून विक्री केला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनंतर एमआयडीसीतील एका आस्थापनाच्या गोदामावर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान साध्या तांदळावर रासायनिक पावडर फवारून कृत्रिम सुगंध व बासमतीचा भास निर्माण करण्यात येत असल्याचे आढळून आले.

नंतर या बनावट तांदळाचे ‘खुशी गोल्ड’ ब्रँडच्या बॅगांमध्ये आकर्षक पॅकिंग करून विक्रीसाठी तयार ठेवण्यात येत होते. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी साठवलेला तांदूळ व वापरण्यात येणारी रासायनिक पावडर ताब्यात घेतली आहे. एकूण जप्त केलेल्या बनावट बासमती तांदळाची किंमत तब्बल 62 लाख रूपये असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तांदळाचे नमुने अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

ही कारवाई शुक्रवारी रात्री सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, नमुना सहाय्यक सागर शेवंते व शुभम भस्मे यांनी केली. या प्रकरणाचा तपास अन्न सुरक्षा अधिकारी बडे करीत आहेत. या आस्थापनाचे अहिल्यानगर शहरातील दाळमंडई परिसरातही दुकान असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दुकानातून बनावट बासमती तांदळाची विक्री केली जात असल्याचा संशय असून, यासंबंधीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ करणार्‍या भेसळीच्या धंद्यावर आळा बसला आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...