spot_img
देशदिल्लीत आपची घसरगुंडी; अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, 'दारू घोटाळा नडला'

दिल्लीत आपची घसरगुंडी; अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, ‘दारू घोटाळा नडला’

spot_img

राळेगणसिद्धी | नगर सह्याद्री
गेल्या दोन विधानसभा एकहाती सत्ता मिळविणाऱ्या आपला चौथ्या निवडणुकीत दिल्लीकरांनी खाली खेचले आहे. अद्याप निकाल हाती आलेले नसले तरी भाजपा 45, आप 25 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचा तर सुफडा साफ झाला आहे. वेगवेगळे लढण्याची खुमखुमी काँग्रेस आणि आपला नडली असली तरी केजरीवालांचे एकेकाळचे सहकारी अण्णा हजारे यांची बोलकी प्रतिक्रिया आली आहे.

दिल्ली निकालावर अण्णा हजारे यांनी केजरीवालांना दारू घोटाळ्याने बुडविले, असे म्हटले आहे. काही दिवसांपूवच हजारेंनी केजरीवालांना स्वाथ म्हटले होते. अरविंद केजरीवाल पूव तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता. मात्र ज्या दिवशी राजकारण आणि पाटच्या नादात अरविंद केजरीवाल स्वाथ झाला, तेव्हाच त्याच्यापासून मी दूर झालो, या शब्दांत अण्णा हजारे यांनी निशाणा साधला होता. तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते, असे हजारे म्हणाले होते.

आजच्या आपच्या दिल्ली पराभवावर हजारेंनी म्हटले की, मी बऱ्याच काळापासून सांगत आलो आहे की निवडणूक लढवताना उमेदवाराचे चारित्र्य, चांगले विचार आणि प्रतिमेवर कोणताही डाग नसावा. पण, त्यांना (आप) ते समजले नाही. ते दारू आणि पैशात अडकले, त्यामुळे त्यांची (अरविंद केजरीवाल) प्रतिमा खराब झाली आणि म्हणूनच त्यांना निवडणुकीत कमी मते मिळत आहेत, असे मत हजारे यांनी व्यक्त केले.

तसेच लोकांनी पाहिले की केजरीवाल चारित्र्याबद्दल बोलतात पण दारूमध्ये वाहत गेले. कारण त्यात पैसा आला. राजकारणात आरोप केले जातात. पण दोषी नाही हे सिद्ध करावे लागते. सत्य सत्यच राहील. जेव्हा पहिली बैठक झाली तेव्हा मी ठरवले की मी पक्षाचा भाग राहणार नाही आणि मी त्या दिवसापासून दूर राहिलो, असे हजारे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...