spot_img
अहमदनगरआम आदमी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना लुटले! गुलमोहोर रस्त्यावर नेमके काय घडले? पहा..

आम आदमी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना लुटले! गुलमोहोर रस्त्यावर नेमके काय घडले? पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
वाहनाला कट मारून नुकसान केल्याचा आरोप करत धक्काबुक्की करून आम आदमी पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष राजू सुर्यभान आघाव (वय ५३ रा. खेडले परमानंद, ता. नेवासा) यांना लुटले. सावेडी उपनगरातील गुलमोहोर रस्त्यावर सुरभी हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. या प्रकरणी आघाव यांनी मंगळवारी (२५ जून) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरूध्द सामुहिक जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष आघाव हे रविवारी (२३ जून) नगर शहरात आले होते.

ते दुपारी सावेडी उपनगरातील गुलमोहोर रस्त्यावरून जात असताना साडेबाराच्या सुमारास सुरभी हॉस्पिटलजवळ त्यांच्या वाहनाला पाठीमागून आलेल्या वाहन चालकाने वाहन आडवे लावले. त्या वाहनातून चौघे उतरले व ते आघाव यांना म्हणाले, तु आमच्या गाडीला कट मारून गाडीचे नुकसान केले आहेफ. त्यावरून त्यांच्यात वाद झाले व त्या चौघांनी आघाव यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली. त्यांच्या शर्ट व पॅन्टच्या खिशातील सुमारे १८ ते १९ हजार रूपयांची रोख रक्कम दमदाटी करून काढून घेतली.

फोन पे अ‍ॅपव्दारे दोन वेळेस एक एक हजार असे दोन हजार रूपये ऑनलाईन घेतले व तेथून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदरचा प्रकार रविवारी घडला असून आघाव यांनी मंगळवारी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...