नगर सह्याद्री वेब टीम
सध्या देशभरात महिला सुरक्षिततेची चर्चा पाहायला मिळत आहे. महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळत आहे. अशात आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. या अभिनेत्रीने सुपरस्टार रितेश देशमुखसोबत काम केले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ चित्रपटातल अभिनेत्री अदिती पोहनकर आहे.
अभिनेत्री अदिती पोहनकरने एका मिडिया मुलाखतीत आपल्या आयुष्यातील वाईट प्रसंग सांगितला आहे. तिने सांगितले की, “दादर स्टेशनला मी ट्रेनने प्रवास करत होते. मी फर्स्टक्लासच्या डब्ब्यात चढले. त्या डब्यात काही लहान शाळेची लहान मुले देखील होती. तेव्हा मी ११ वीत होते. माझ्या समोर एक मुलगा उभा होता. तेव्हा दादरवरून ट्रेन निघाल्यावर त्या मुलाने माझ्या छातीला हात लावला…”
पुढे अदिती म्हणाली, “ही घटना सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. ही घटना घडली तेव्हा मी चांगल्या कपड्यामध्ये होती. मी शॉर्ट कपडे घातले नव्हते तर मी कुर्ता घातला होता. तेव्हा त्याच्या या कृत्याने मला धक्का बसला. त्यानंतर या घटनेची तक्रार करायला मी पोलीस स्टेशनला गेले. मात्र पोलिसांची प्रतिक्रिया ऐकून मी हादरले. “पोलीस म्हणाले की, तुम्हाला काही झाले तर नाही ना…आता त्या मुलाला कुठे शोधणार आम्ही?” असे बोलून त्यांनी माझ्या तक्रारीला उडवून लावले.”
शेवटी आदिती म्हणाली,” मला तो मुलगा पुन्हा स्टेशनला दिसला. तो मुलगा दुसऱ्या मुलीसोबत तेच करत असताना मी पोलीसांना घेऊन गेले. मात्र त्यानंतर पोलिसांनी आदितीला तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा पुरावा मागितला. तेव्हा आदिती म्हणाली,”त्याने माझ्यासोबत जर वाईट कृत्य केल आहे तर मला माहीत असणारच ना…” जेव्हा मी त्या मुलाकडे पोलिसांना घेऊन गेले तेव्हा त्याने सर्व आरोप फेटाळले. तेव्हा मी खूप चिडून मोठ्या आवाजत त्याच्याशी बोलू लागली. तेव्हा अखेर त्या मुलाने आपल्या कृत्याची कबुली दिली.”