spot_img
अहमदनगरकेडगावात तरुणाच्या खिशावर भरदिवसा दरोडा; ३२ हजारासाठी लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला..

केडगावात तरुणाच्या खिशावर भरदिवसा दरोडा; ३२ हजारासाठी लोखंडी रॉड, तलवारीने हल्ला..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगरातील केडगाव येथील शिवाजीनगर परिसरात शंकर महाराज मठाजवळ चार जणांनी तरुणावर लोखंडी रॉड आणि तलवारीने हल्ला करून ३२ हजार रुपये लुटल्याची खळबळजनक घटना घडली.फिर्यादी संग्राम रमेश गिते (वय २५, रा. शिवाजीनगर, केडगाव, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

आरोपी अजित ठुबे, कैलास दहिफळे, ऑकार सदाफूले आणि यश भांवरकर (सर्व रा. केडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.दिनांक २६ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास संग्राम बँकेत पैसे भरण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. अजित ठुबे याने लोखंडी रॉड आणि कैलास दहिफळे याने तलवारीने धमकावत संग्राम यांच्या खिशातील ३२ हजार रुपये बळजबरीने काढले.

आरोपींनी संग्राम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी रॉड फेकून मारला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या संग्राम यांच्या आईलाही मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. कोतवाली पोलिसांनी फिर्यादी संग्राम गिते यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विश्वास गाजरे, विक्रम वाघमारे आणि पोसई प्रवीण पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धर्माच्या नावाखाली… ; घुलेवाडी येथील घटनेवर बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

संगमनेर / नगर सह्याद्री घुलेवाडी सप्ताह जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे....

दारू पिण्याची शर्यत बेतली जीवावर; एकाचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री - सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे रविवारी (१७ ऑगस्ट) घडलेल्या...

नगरमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला सापळा

कृष्णा लॉजवर छापा | तिघांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरातील बुरुडगाव रोडवरील कृष्णा लॉजवर कोतवाली...

पारनेरमध्ये बिबट्याचा हैदोस, कुठे घडला प्रकार पहा

निघोज | नगर सह्याद्री बिबट्याचा निघोज, गुणोरे, गाडिलगाव, कुंड, खंडोबा पाऊतके परिसरात हैदोस सुरू असून...