spot_img
अहमदनगरधारदार शस्त्राने तरुणावर सपासपवार! बालिकाश्रम रस्त्यावर खळबळजनक प्रकार..

धारदार शस्त्राने तरुणावर सपासपवार! बालिकाश्रम रस्त्यावर खळबळजनक प्रकार..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील बालिकाश्रम रस्ता येथे लक्ष्मी उद्यानासमोर सोमवारी (27 जानेवारी) रात्री एका तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार अपघात झाल्याचे कारणावरून घडला आहे.

निखील अंबादास इपलपेल्ली (वय 25, रा. शुभवास्तू अपार्टमेंट, अहिल्यानगर) व त्याची बहिण-खुशी आणि मित्र-ओम नरेश थदाणी हे बालिकाश्रम रस्ता, लक्ष्मी उद्यानासमोर गेले असता दुचाकी (एमएच 16 सीएक्स 0408) वरून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी निखील व त्याच्या मित्रास लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण केली. यातील एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने निखीलच्या कंबरेच्या उजव्या बाजूला वार करून जखमी केले.

त्यांचा मित्र ओम यालाही मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांपैकी एका इसमाचे केस लांब होते, तो सडपातळ होता, तर दुसरा मध्यम बांध्याचा होता आणि त्याने कपाळावर टिळा लावलेला होता. घटनेनंतर जखमींना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले.या प्रकरणी निखील इपलपेल्ली यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार दीपक जाधव अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...