spot_img
अहमदनगरगुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला, नेमका कसा घडला प्रकार

गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला, नेमका कसा घडला प्रकार

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला म्हणून तरूणावर कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगडाने हल्ला करून त्याच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दोन महिलांना देखील मारहाण करण्यात आल्याची घटना खांडके (ता. नगर) शिवारातील भगवान ठोंबे यांच्या घरी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

किरण यमाजी चेमटे (वय 30 रा. खांडके) व चंद्रभागा अर्जुन ठोंबे (पत्ता नाही) हे दोघे जखमी झाले आहेत. जखमी किरण यांनी शनिवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत राजेंद्र ठोंबे, निखिल सुभाष ठोंबे, राजेंद्र महादेव ठोंबे, साहील सुभाष ठोंबे, गणेश सुभाष ठोंबे, गौतम रामदास ठोंबे (सर्व रा. खांडके) व एक पुणे येथील अनोळखी व्यक्ती यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित आरोपी यांनी शुक्रवारी रात्री चंद्रभागा ठोंबे यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले. घरात घुसून चंद्रभागा यांना मारहाण केली. कविता ठोंबे यांना देखील मारहाण केली. त्यांनी मदतीसाठी किरण चेमटे यांना बोलून घेतले. किरण तेथे येताच संशयित आरोपी त्यांना म्हणाले, ‘तु सुध्दा मागील वेळेस सप्ताह चालू असताना आमच्या विरूध्द गुन्हा दाखल का केला आहे. तु जर आता भांडण सोडविण्यासाठी आला तर तुला सुध्दा खतम करून टाकू’ अशी धमकी दिली. अनिकेत ठोंबे म्हणाला, ‘तु सुध्दा काल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भगवान ठोंबे सोबत पोलीस स्टेशनला गेला होता थांब तुला सुध्दा जिवंत ठेवत नाही, खल्लासच करून टाकतो’, असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता, रॉड, दांडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गांगर्डे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार धस यांचे मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप; मंत्री विखे पाटील म्हणाले, पुरावे असतील तर..

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - Radhakrishna Vikhe Patil : मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आमदार सुरेश...

संतोष देशमुख प्रकरणात शरद पवारांनी उचलले मोठे पाऊल, केले असे…

मुंबई / नगर सह्याद्री - बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राजकीय वातावरणात एकच...

शेवटच्या टोकापर्यंत पाणी कसे मिळेल यासाठी नियोजन करा, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक...

आमदार शिवाजी कर्डिले यांचा नगर पंचायत समितीवर डोळा; पहा पडद्याआड काय घडतंय…

नगर तालुका महाविकास आघाडीतील नाराजी भाजपाच्या पथ्यावर | ...तर भाजपा स्वबळावर सुनील चोभे | नगर...