spot_img
अहमदनगरमाळीवाडा परिसरात तरुणावर कोयत्याने सपासप वार!

माळीवाडा परिसरात तरुणावर कोयत्याने सपासप वार!

spot_img

अहिल्यानगर नगर सहयाद्री:-
नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. माळीवाडा परिसरात तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहे. याप्रकरणी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ल्यात शहनवाज सलीम शेख (वय 38 रा. मुकुंदनगर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर फमति, रयान, फैजान (पूर्ण नावे, पत्ता माहिती नाही) व इतर अनोळखी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी (06 मार्च) सायंकाळी 7:15 ते 7:45 च्या सुमारास घडली. फिर्यादी शहनवाज हे रोजच्या प्रमाणे सफर ट्रॅव्हल्स कार्यालयात कामासाठी गेले होते.

रात्रीच्या सुमारास ते माळीवाडा बसस्टँड जवळील स्वच्छतागृहातून परतत असताना रस्त्यावर एक मॅक्स चारचाकी वाहन आडवे उभे असल्याचे दिसले. त्यांनी वाहनाच्या चालकाला रस्ता अडवू नकोस, असे सांगताच, तेथे उभ्या असलेल्या फमति याने संतापून शिवीगाळ सुरू केली. यावर शहनवाज यांनी त्याला शांत राहण्यास सांगून तेथून निघून गेले.

यानंतर काही वेळाने शहनवाज एम. के. रॉयल ट्रॅव्हल्स कार्यालयाजवळ असताना फमति, रयान, फैजान आणि अन्य चार अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी लाथाबुक्क्यांनी, दगडांनी तसेच कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात शहनवाज यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि दंडावर गंभीर जखम झाली. तसेच पाठीवर, डोक्यावर आणि गुप्तांगावरही मार लागला आहे.

दरम्यान, या हल्ल्यावेळी एस. के. ट्रॅव्हल्समधील कर्मचारी मोसिन शेख, वसिम बागवान, जावेद शेख आणि काही रिक्षाचालकांनी घटनास्थळी धाव घेत शहनवाज यांना वाचवले. संशयित आरोपी पळून गेल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलीस अंमलदार औटी करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...