पारनेर । नगर सहयाद्री:-
गेल्या काही महीण्यांपुर्वी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांनी पठार भागातील तरुणांच्या क्षारिरीक क्षमतांना वाव मिळावा या उद्देशाने सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार काल केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे (युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्याकडे काल तालुक्यातील पठार भागात सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारण्याची लेखी मागणी केली. यावेळी संबंधित मागणीची खडसे यांनी तातडीने दखल घेऊन अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना संबंधित क्रिडा संकुल उभारणीचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती कोरडे यांनी दिली.
पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार व परीसरातील तरुणांच्या संकल्पनेतून विरोली व करंदी या गावांच्या सीमेवर असलेल्या गणपती फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात तरुणांचा खेळातील उत्साह पाहून कोरडे यांनी शब्द दिला होता. सदरच्या मागणीची मंत्री महोदयांकडून घेण्यात आलेली दखल, सदर मागणीच्या पुर्णत्वासाठी मिळालेला सकारात्मक प्रतिसाद हा एकप्रकारे पठार भागातील तरुणांना दिलेल्या शब्दपुर्तीचा वचननामाच असल्याचे मत कोरडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कोरडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पदाच्या माध्यमातून आपल्या कल्पक बुद्धीमत्तेच्या आणि सर्वांगीण विकासाचे व्हीजन ठेवून सुरू असलेल्या सामाजिक व राजकीय वाटचालीच्या जोरदार आजवर तालुक्यातील अनेक महत्वाकांक्षी छोटे मोठे प्रकल्प मार्गी लावल्याचे तालुक्यातील जनतेने पाहीले असल्याने पठार भागातील तरुणांच्या क्षारिरीक, मानसिक व वैचारिक क्षमता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशा क्रिडा संकुलाची निर्मिती खात्रीशीरपणे होणार असल्याबाबत या भागातील नागरीकांच्या मनात विश्वास निर्माण होणार आहे.