अहिल्यानगर /नगर सह्याद्री –
नगर तालुक्यातील अरणगाव येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल ४९ हजार रुपये किमतीच्या शेळ्या व बोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी जनावरे पळवण्यासाठी चक्क चारचाकी (सुमो) वाहनाचा वापर केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी मयुर दिलीप थोरात (वय २७, रा. आरणगाव, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना १२ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते १३ नोव्हेंबरच्या पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली. थोरात यांच्या घराशेजारील जनावरांच्या खोलीतून चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीच्या ६ शेळ्या, १८ हजार रुपये किमतीचे ३ बोकड आणि १ हजार रुपयांची एक पाठ अशी एकूण ४९ हजार रुपयांची ९ जनावरे चोरून नेली.
चोरट्यांनी आपल्या ताब्यातील सुमो गाडीत ही जनावरे कोंबून पोबारा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खरात हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



