spot_img
अहमदनगरसात तासात लावला दुचाकी चोराचा छडा; जालना जिल्ह्य़ातील 'म्होरक्या' जेरबंद

सात तासात लावला दुचाकी चोराचा छडा; जालना जिल्ह्य़ातील ‘म्होरक्या’ जेरबंद

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री
येथील खर्डा चौकातील मक्का मस्जिद समोरून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासात जामखेड पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीचा तपास केला आहे. या कामगिरीबद्दल जामखेड पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फिर्यादी कलिम मकसूद मुल्ला (वय ४३ वर्षे, रा. बार्शी, जि. सोलापुर) यांनी आपल्या भाचा चाँदपाशा दादा शेख यांचेसह १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जामखेड येथील खर्डा चौकातील मक्का मस्जिद येथे धार्मिक कार्यक्रमासाठी भेट दिली होती. कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी १ वाजता त्यांना आपली हिरो कंपनीची मोटारसायकल (MH.13 EA.5147) चोरी झाल्याचे आढळले.

या घटनेची फिर्याद जामखेड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या तपासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सूत्रे हालवली. गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोलीस हेडकॉन्टेबल प्रवीण इंगळे यांनी घटनास्थळी सिसिटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या साहाय्याने आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला. रात्री ११ वाजता पथकाने आरोपीच्या शोधार्थ जालना जिल्ह्य़ातील एकलहरे गावात सापळा रचला. पहाटे ४ वाजता आरोपी कैसर नबी शेख (वय ४५, रा. एकलहरे) याला अटक करण्यात आली आहे. दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान आरोपीस जामखेड पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

आरोपीकडून अनेक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल प्रवीण इंगळे, पोलीस नाईक संतोष कोपनर, पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे, व कुलदीप घोळवे यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणारी टोळी पकडली!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष...

वारकऱ्याला काठीने मारहाण; पंढरीत नेमकं काय घडलं?

Maharashtra News: आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांमध्ये आज सकाळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना संकटांचा सामना करावा लागणार?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...