spot_img
अहमदनगरपारनेरच्या राजकारणात ट्विस्ट; सुजित झावरे किंगमेकरच्या भूमिकेत!, काय घडलं पहा...

पारनेरच्या राजकारणात ट्विस्ट; सुजित झावरे किंगमेकरच्या भूमिकेत!, काय घडलं पहा…

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री-
विधानसभेच्या पारनेर मतदारसंघात अजित पवार यांच्या आदेशाने उमेदवारी मागे घेतलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. पंचवीस- तीस हजार गठ्ठा मतदान पाठीशी असणार्‍या सुजित झावरे यांच्या समर्थकांना त्यांच्या आदेशाची सध्या प्रतिक्षा आहे. अजितदादांना शब्द दिलाय आणि तो मी पाळणार, अशी भूमिका ते खासगीत मांडत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ते सक्रिय झालेले दिसून येत नाहीत. कार्यकर्त्याना विश्वासात घेऊनच मला जाहीरपणे दाते सरांसोबत जावे लागेल असे ते खासगीत बोलत आहेत.

माजी आमदार वसंतराव झावरे यांनी पंचायत समिती सभापती ते आमदार अशा मोठ्या कालावधीत कार्यकर्त्यांचा मोठा संच जपला. त्याच कालावधीत सुजित झावरे यांचा राजकीयदृष्ट्या उगम झाला. पंचायत समिती, जिल्हा परिषद या सारख्या संस्थांच्या महत्वाच्या पदांंवर काम करताना सुजित झावरे यांनी आपल्या कामाची वेगळी छाप उमटवली. त्यातून युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सुजित झावरे यांना जोडला गेला. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तालुक्यात तयार झाले आणि गेल्या काही वर्षात सुजित झावरे हे सत्तेत कोठेही नसतानाही ही फळी त्यांच्या पाठीशी कायम आहे.
विधानसभा निवडणुक जाहीर होण्याआधी त्यांनी उमेदवारी मिळणार असे गृहीत धरुन मंत्रालय ते जिल्हा प्रशासन येेथे व्यक्तीगत संबंध वापरले आणि विविध योजनांमधून निधी मिळवला. त्यातून मतदारसंघात बंधारे, रस्त्यांसह अनेक सार्वजनिक हिताची कामे मार्गी लागली. अजित पवार यांना भेटून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालू असताना महाविकास आघाडीकडून त्यांच्या शिवाय काशिनाथ दाते, विजू औटी, माधवराव लामखडे यांनीही मागणी केली. मात्र, हे करताना या सार्‍यांनी मिळून तुुम्ही द्याल तो उमेदवार आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका घेतली.

ज्येष्ठ नेते काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर होताच सुजित झावरे यांच्या समर्थकांचा हिरमोड झाला. त्यातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी केली तर विजय होणार नाही आणि आपली उमेदवारी नीलेश लंके यांच्या विजयाची शिडी होईल असे लक्षात येताच सुजित झावरे यांनी अजित पवार यांना भेटून आपली उमेदवारी मागे घेतली. दाते यांना सुजित झावरे यांच्या माघारीने मोठा दिलासा मिळाला.

कार्यकर्त्यांची आणि त्यातही युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी सुजित झावरे यांच्या सोबत आहे. तालुक्यातील गावागावात आणि वाड्यावस्त्यांवर त्यांचा स्वत:चा एक वर्ग आहे. अनेक वर्षे कोणतीही सत्ता नसताना झावरे हे या समर्थकांना सांभाळतात आणि त्यांच्या सुखदु:खात सहभागी होतात ही त्यांची जमेची बाजू!

विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना सुजित झावरे यांनी त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असल्याचे समजते. या बैठकीत ते काय भूमिका घेतात याकडे सार्‍यांच्याच नजरा लागल्या आहेत. माजी आमदार विजय औटी यांच्या अपक्ष उमेदवारीत ‘कोणीतरी स्पॉन्सर’ असल्याचा वास येऊ लागला असताना आता झावरे यांची भूमिका नक्की काय असणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवार यांचे प्राजक्त तनपुरेंबाबत महत्वाचे विधान, नेमकं काय म्हणाले पहा…

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे जाहीर सभा राहुरी | नगर सह्याद्री फोडाफोडीमुळे लोकसभेत...

निमगावकरांची खासदार निलेश लंकेंना चपराक!

संदेश कार्लेंचे फटायांच्या आतषबाजीत जंगी स्वागत पारनेर | नगर सह्याद्री गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके...

विजयराव मैदानात: जिंकण्यासाठी नव्हे पाडण्यासाठी; पण कोणाला?; कोणी दिली सुपारी..!

बाजार समिती निवडणुकीत केलेली चूक विजय औटी यांना भोवली | रामदास भोसले हे पारनेरची...

‘ईडी’ची महाराष्ट्रात मोठी कारवाई, २४ ठिकाणी छापेमारी, १२५ कोटी…

मुंबई / नगर सह्याद्री - मालेगाव येथील एका व्यापाऱ्याने निवडणुकीतील गैरप्रकारांसाठी पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या...