Crime News: एका लॉजवर महिलेची हत्या तिच्याच बॉयफ्रेंडने केली असल्याचे उघड झाले आहे. आरोपीने सुरूवातीला सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मोबाईलचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले होते. पण पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.
कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यामध्ये ही भयंकर घटना घडली होती. २० वर्षीय महिलेचा लॉजमध्ये मृतदेह आढलून आला होता. आरोपीने गर्लफ्रेंडच्या तोंडात स्फोटकं भरली आणि तिला ट्रिगरने उडवून दिले होते. या प्रेम प्रकरणाचा लॉजवर भयंकर शेवट झाला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सध्या कर्नाटकात या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षीय महिलेची तिच्या बॉयफ्रेंडने निर्घृण हत्या केली. त्याने तरुणीच्या तोंडात स्फोटके भरली आणि खाणींमध्ये जिलेटिनच्या काड्या फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रिगरने तिला उडवून दिले. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. मृत महिलेचे नाव रक्षिता होते. ती हंसुर तालुक्यातील गेरासनहल्ली गावात राहणारी होती.
ती बॉयफ्रेंड सिद्धराजूसोबत भेर्या गावातील एका लॉजवर थांबली होती. रक्षिताचे लग्न केरळच्या एका मजूरासोबत झाले होते. पण रक्षिताचे सिद्धराजूसोबत अनैतिक संबंध होते. सिद्धराजू तिच्याच नात्यातील आहे. लॉजवर असताना दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात रागाच्या भरात सिद्धराजूने रक्षिताच्या तोंडामध्ये स्फोटक पदार्थ ठेवले आणि टिगरने ते उडवून दिले.
या घटनेनंतर सिद्धराजने सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने दावा केला की, रक्षिताचा मृत्यू मोबाईल फोनच्या स्फोटामुळे झाला. पण अखेर सत्य उघड झाले. सिद्धराज पळून जाण्याच्या प्रयत्नात होता तेवढ्यात नागरिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर रक्षिताचा मृतदेह बेडवर आढळून आला. तिच्या चेहऱ्याचा खालचा भाग पूर्णत: फाटला होता. सर्वत्र रक्त पडले होते. रक्षिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे