spot_img
ब्रेकिंगपावसाच्या धारा की कडक उन्हाळा! हवामानात खात्याची महत्वाची अपडेट

पावसाच्या धारा की कडक उन्हाळा! हवामानात खात्याची महत्वाची अपडेट

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
गेल्या काही दिवसांत देशातील हवामानात बदल जाणवला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, आसाम आणि मेघालयातील पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. दिल्लीतही तापमानात २.४ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पुढील २४ तासांत वायव्य भारतातील कमाल तापमानात २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे तापमान पुन्हा २ ते ४ अंशांनी घसरण्याचा अंदाज आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहील, परंतु त्यानंतर तापमानात घट होऊ शकते. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी जम्मू आणि हिमाचल प्रदेशात वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाबमध्येही गारपीट होऊ शकते. हवामान खात्याने जम्मू, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उत्तराखंडसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

मध्य उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम मध्य प्रदेश, आसाम आणि मेघालयात गेल्या २४ तासांत कमाल तापमानात घट झाली आहे. विदर्भातील अकोला येथे ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे सर्वाधिक होते. पश्चिमी विक्षोभामुळे सोमवारी देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४ मार्चपर्यंत पश्चिम हिमालयीन भागांत जोरदार हिमवृष्टी होऊ शकते, तर कर्नाटकच्या काही किनारी भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

हवामान बदलामुळे रुग्णाच्या संख्येत वाढ!
सध्या हवामानात झपाट्याने बदल होत असून, दुपारी वाढलेले तापमान आणि सकाळ-संध्याकाळी गारवा जाणवत आहे. या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज रुग्णालयांत अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या काळात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि अन्य त्रास होऊ शकतात. तळलेले पदार्थ टाळावेत, भरपूर पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेटेड ठेवावे. लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...