spot_img
देशतीन मजली इमारत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?

तीन मजली इमारत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?

spot_img

building collapse : तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अनेक जणं ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात असून ढिगाऱ्याखालून १३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश देण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये शनिवारी रात्री झाकीर कॉलनी मध्ये सदरची घटना घडली आहे . मुसळधार पावसामुळे तीन मजली इमारत कोसळली आहे. या घटनेत आठ जणांना मृत्यू झाला आहे. इमरातीच्या ढिगाऱ्याखालून १३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या पैकी काही जण किरकोळ जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

या घटनेनंतरही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी तत्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना तातडीने मदतीच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दु:ख व्यक्त केलं होतं. लखनौमधील इमारत कोसळल्याची घटना दुर्देवी आहे. या घटनेची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांना मदतीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थिती बचावकार्य सुरू असून आम्ही स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...