अहमदनगर । नगर सह्याद्री –
माळीवाडा बसस्थानकासमोरील अंबर प्लाझा इमारतीजवळील जागेत भीषण आग लागली होती. बुधवारी (दि. 6) सकाळी 11 च्या दरम्यान ही घटना घडली. महानगर पालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नव्हते.
अंबर प्लाझा इमारतीजवळील जागेत सकाळी 11 च्या दरम्यान आग लागली. परिसरात ठेवलेल्या पाईपने पेट घेतला. त्यामुळे धुराचे मोठे लोट दिसत होते. अग्निशमन विभागास माहिती देताच बंब घटनास्थळी दखल झाला. थोड्याच वेळात आग आटोक्यात आणली. यात आर्थिक नुकसान किती झाले याची माही चौकशीअंती समोर येईल.