spot_img
महाराष्ट्रभीषण स्फोटाने भंडारा हादरलं! 'इतक्या' जणांचा मृत्यू

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

spot_img

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट
भंडारा | नगर सह्याद्री:-
भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला. कंपनीच्या आर के ब्रांच सेक्शनमध्ये हा ब्लॉस्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कंपनीच्या आर के ब्रांच सेक्शनमध्ये हा ब्लॉस्ट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो.

या कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा स्फोट झालेला आहे. या स्फोटाचा आवाज जवळपास पाच किलोमीटरपर्यंत नागरिकांना ऐकू आला. त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल ते यावरून कल्पना करू शकतो. स्फोट झाल्यानंतर कंपनीला भीषण आग लागली. धुराचे लोट आसपासच्या परिसरात पसरले आहेत. स्फोटादरम्यान कंपनीमध्ये 13 कर्मचारी अडकले होते. त्यापैकी 5 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले असून तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्फोटाबाबत ट्वीट केले. यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, मभंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...