spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी एका मतदार संघाची जोरदार चर्चा?, उमेदवार कोण?

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी एका मतदार संघाची जोरदार चर्चा?, उमेदवार कोण?

spot_img

Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आघाडी घेत पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. महायुती आणि महाविकास आघाडीत यंदा काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. जागा वाटपासाठी मॅरेथॉन बैठका देखील पार पडत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदार संघातील महायुतीच्या १२ तर महविकास आघाडीच्या १२ अशा २४ उमेदवाराकडे ३७ लाख सत्तर हजार ९८ मतदारांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघातील राखीव असलेला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत. काँग्रेस पक्षात अंतर्गतच दोन गट झाल्याचं दिसुन येत आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे हे आपल्या पाच वर्षातील कामावर यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसकडून प्रबळ दावेदार आहेत. दुसरीकडं काँग्रेसचे माजी आमदार राहीलेले दिवंगत जयंत ससाणे यांचे पुत्र आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले करण ससाणे हे कानडे यांच्या विरोधात असुन, ते काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.

नेत्यांमधील वादामुळं श्रीरामपूरचं राजकारण पुन्हा चर्चेत आलं आहे. तर महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटा कडून माजी आमदार भाऊसाहेब मल्हारी कांबळे तसेच माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे, भाजपाकडून नितीन दिनकर, नितीन उदमले इच्छुक आहे. इच्छुक उमेदवारांनी माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी मुंबईच्या फेऱ्या वाढवल्या आहेत अशी चर्चा सध्या मतदार संघात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अजितदादांना धक्का!; नागवडेंच्या हाती मशाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा मतदारसंघांमध्ये अनेक राजकीय उलटफेर होत आहेत. काही...

सहा खात्याच्या राज्यमंत्रीपदातून वाडा भरवला; आ. प्राजक्त तनपुरेंच्या विरोधात राहुरीकरांची पश्चातापाची भावना

राहुरी | नगर सह्याद्री:- कोणताही जनसंपर्क नसताना फक्त तनपुरेंच्या घरात जन्म आणि मामाची फिल्डींग यातून...

संदीप कोतकर थांबणार? दोन दिवसात भूमिका जाहीर करणार!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहर विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत माजी महापौर संदीप कोतकर हेच...

भाजप पक्षश्रेष्ठींना यश! कोल्हे यांची निवडणुकीतून माघार? ‘ती’ पोस्ट चर्चत; “कुछ पल के अंधेरे का अंत…”

कोपरगाव । नगर सहयाद्री:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारीसाठी आर्ज दाखल करण्यासाठी...