spot_img
अहमदनगरदोन गटात तुफान राडा! दगडफेक करत वाहने जाळली? नगर जिल्ह्यात नेमकं चाललंय...

दोन गटात तुफान राडा! दगडफेक करत वाहने जाळली? नगर जिल्ह्यात नेमकं चाललंय काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनात सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. दरम्यान आता अकोल्यात दोन गटात मोठा वाद झाल्याची बातमी समोर आली आहे. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच दोन गटाने एकमेकांवर दगफेक,तसेच जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. दोन गटात मोठा राडा झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

अकोला शहरातील हरिहर पेठमध्ये दि. ०७ रोजी दुपारच्या सुमारास सदरचा प्रकार घडला. हरिहर पेठमध्ये रिक्षा आणि बाईकची धडक झाली. या धडकेमुळे किरकोळ वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन मोठ्या राड्यात झाले. हे भांडण इतके वाढले की दोन गट आमनेसामने आले. वाद इतका टोकाला पोहोचला की दोन गटात तुफान राडा झाला. तसेच घटनेतील गाड्या देखील जाळण्यात आल्या.

या राड्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न संबंधित परिसरात निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. ही घटना अकोल्यातील हरीपेठ भागात घडली आहे. राड्या दरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये नागरिक जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दोन गटात मोठा राडा झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...