spot_img
ब्रेकिंगमहायुतीत पडला मिठाचा खडा? अजितदादांच्या फोटोवर काळं कापड टाकलं; भर कार्यक्रमात नेमकं...

महायुतीत पडला मिठाचा खडा? अजितदादांच्या फोटोवर काळं कापड टाकलं; भर कार्यक्रमात नेमकं काय घडलं..

spot_img

Politics News: महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. बारामती शहरात लावलेल्या बॅनरवरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे फोटो वगळण्यात आले आहेत, आणि त्याचप्रमाणे, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वापरण्यात आलेला नाही, यामुळे महायुतीत संघर्ष वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने बारामतीत एकनाथ गणेश फेस्टिवलचे आयोजन केले. याच्या उद्घाटनाला अजित पवार आले नाही. यामुळे त्यांच्या फोटोवर काळे कापड टाकले गेले. शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी हे कृत्य केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांना कार्यक्रमाला येण्यासाठी तीन ते चार वेळा विनंती केली, परंतु ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही.

बारामतीत एका फ्लेक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असले तरी अजित पवारांचा फोटो समाविष्ट केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यातील एक होर्डिंग देखील अजित पवारांच्या फोटोशिवाय लावण्यात आले आहे, यामुळे बारामतीतील बॅनर चर्चेचा विषय बनले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...