spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगरमध्ये खळबळ! चार सख्ख्या बहिणींवर अत्याचार, आरोपीने दिली कबुली, वाचा प्रकरण

अहिल्यानगरमध्ये खळबळ! चार सख्ख्या बहिणींवर अत्याचार, आरोपीने दिली कबुली, वाचा प्रकरण

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात चार सख्ख्या बहिणींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अटकेत असलेला आरोपी बजरंग साळुंखेने सहा महान्यांपूर्वी आपल्या मेव्हण्याची हत्या करून मृतदेह घराजवळ पुरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मृतदेह उकरून काढत त्याच जागेवरच शवविच्छेदन केले. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे.

आई-वडील विभक्त झाल्याने दूरचा नातेवाईक असलेल्या बजरंग साळुंखे याच्याकडे सांभाळ करण्यासाठी दिलेल्या सख्ख्या ४ सख्ख्या बहिणींवर त्याने आणि त्याच्या मेव्हण्याने बलात्कार केल्याचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणी राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे राहणारा आरोपी बजरंग साळुंखे आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली होती. तर बेपत्ता आरोपी आणि साळुंखेचा मेव्हणा निलेश सारंगधर याचा शोध पोलिस घेत होते.

चौकशी दरम्यान आरोपी बजरंग साळुंखेने ६ महिन्यांपूर्वी मेव्हणा निलेश सारंगधर याची गळा दाबून हत्या केल्याची आणि पत्नीच्या मदतीने मृतदेह दवणगाव येथील घराजवळ पुरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी बजरंग साळुंखेला घटनास्थळी नेत मृतदेह उकरून काढला आणि जागेवरच शवविच्छेदन केले. पोलिस बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करत असताना हत्येचा उलगडा झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

चारही पीडित मुली नाशिक जिल्ह्यातील असून त्यातील एक मुलगी सज्ञान तर इतर ३ मुली अल्पवयीन आहेत. सज्ञान झालेल्या मुलीचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले. ती बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आल्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अल्पवयीन मुलींपैकी एक १६, दुसरी १४ आणि तिसरी १० वर्षांची आहे.

मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून आरोपी बजरंग साळुंखे आणि इतर दोन आरोपी आणि त्यांना मदत करणारी एक महिला अशा ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बजरंग साळुंखे आणि त्याच्या बायकोला अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जैन मंदिर: काळे यांचे पुण्यात धरणे आंदोलन; ताबा न सोडल्यास प्राणांतिक उपोषण करणार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा...

बदनामी केली..; किरण काळे यांच्यावर कारवाई करा; पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना कोणी दिले निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या...

आघाडी, युतीचे चित्र धुसर…; स्थानिक आघाड्यांना प्राधान्य

नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी राजकारण तापले | वरिष्ठांकडून आदेश मिळेना अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

बोगस दस्त नोंदवून फसवणूक प्रकरण; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर | नगर सह्याद्री वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक...