spot_img
अहमदनगरनागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महसूलचे एक पाऊल पुढे; 'हा' घेतला निर्णय

नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महसूलचे एक पाऊल पुढे; ‘हा’ घेतला निर्णय

spot_img

संगमनेर / नगर सह्याद्री
ग्रामीण भागातील नागरीक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांची दाखले मिळविण्‍यासाठी होणारी अडचण दुर करण्‍यासाठी महसूल प्रशासनाने अव्‍वल कारकुन व मंडल आधिकारी यांनाच आता प्रतिज्ञापत्रावर स्‍वाक्षरी करण्‍याचे आधिकार दिले आहेत.

महाविद्यालयीन प्रवेश व इतर कारणांसाठी आवश्‍यक असलेले दाखले तसेच प्रतिज्ञापत्र काढून घेण्‍यासाठी महसूल कार्यालयात सध्‍या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शासकीय याजनांच्‍या अंमलबजावणीचा ताणही सध्‍या प्रशासनावर असल्‍याने नागरीकांची गैरसोय व विद्यार्थ्‍यांचे हाल होवू नयेत म्‍हणून महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रशासनाला स्‍थानिक पातळीवरच निर्णय करुन, नागरीक व विद्यार्थ्‍यांना दिलासा देण्‍याबाबत उपाय योजना करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या होत्‍या.

संगमनेर तहसील कार्यालयाने तातडीने कार्यवाही करुन, अव्‍वल कारकुन व मंडल आधिकारी यांनाच आता प्रतिज्ञापत्रावर स्‍वाक्षरी करण्‍याचे आधिकारी दिले आहेत. आठवड्यातील कार्यालयीन वेळेच्‍या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून प्रतिज्ञापत्र स्‍वाक्षरीचे कामकाज तसेच मंडल आधिका-यांनी कार्यालयीन वेळेच्‍या दिवशी आपल्‍या कार्यक्षेत्रातील प्रतिज्ञापत्रातील स्‍वाक्षरी करण्‍याचे कामकाज पाहण्‍याचे आदेश तहसीलदार धिरज मांजरे यांनी तातडीने निर्गमीत केल्‍याने या निर्णयाचा मोठा दिलासा आता ग्रामीण भागातील नागरीक आणि विद्यार्थ्‍यांना मिळाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...