spot_img
ब्रेकिंगभरधाव रिक्षा धडकली; माय-लेकाचा करुण अंत! कुठे घडली घटना? वाचा..

भरधाव रिक्षा धडकली; माय-लेकाचा करुण अंत! कुठे घडली घटना? वाचा..

spot_img

Accident News: वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाड पडले होते, ज्यामुळे रिक्षाच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा कठड्याला धडकली. या भीषण रिक्षा अपघातात माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.शालन पासलकर (वय.६५), दिपक पासलकर (वय.४५) असं मृत्यू झालेल्या दोघा मायलेकांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी: पुण्याच्या राजगड तालुक्यातील रांजणे गावच्या हद्दीत रिक्षाचा भीषण अपघात झाला. आई शालन आणि मुलगा दीपक हे रिक्षाने कानंद येथे मुलीकडे गेले होते. संबंधित रिक्षा पाबे घाट मार्गे पुण्याच्या दिशेने जात होती. याठिकाणीही मुख्य रस्त्यावर झाडे पडलेले होते. रिक्षा तीव्र उतारावर असतानाच चालकाला पडलेले झाड दिसल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

यावेळी भरधाव रिक्षा थेट जवळच्या कठड्याला धडकली ज्यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू टीमने रात्रीच्या अंधारात तात्काळ घटनास्थळी धाव घेत, मदत कार्य करत पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...