spot_img
अहमदनगरतोफखाना पोलीस ठाण्यात जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

तोफखाना पोलीस ठाण्यात जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सीआरपीएफ जवानाने आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलीस निरीक्षकांवर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या टेबलवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी (१३ जून) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहिरू सुर्यकांत मगर (वय ३६, रा. जेऊर बायजाबाई ता. अहिल्यानगर) असे या जवानाचे नाव आहे. त्याने यापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात जागेच्या वादातून फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी तो पोलीस निरीक्षकांच्या दालनात गेला. माझ्या गुन्ह्यातील आरोपी अटक करा, अशी मागणी त्याने केली. आरोपीचा शोध घेत आहोत, आरोपी मिळताच अटक करू, असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले. त्यानंतर त्याने माझ्या भावाला गजराजनगरमध्ये उडविले आहे, माझा भाऊ आयसीयुमध्ये आहे,

मी आत्महत्या करतो असे म्हणत अचानक निरीक्षकांच्या समोरील टेबलवर तीन ते चार वेळा स्वतः चे डोके आपटून घेतले. तुम्ही माझ्या गुन्ह्यातील आरोपी अटक केला नाही, तर मी यापुढेही विष पिऊन अत्महत्या करील, अशी धमकी दिली. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने पोलिसांनी त्याला तत्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. शासकीय अधिकाऱ्यास कर्तव्य बजावण्यासाठी दबाव आणणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे आदी कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; कोणाच्या खात्यावर पैसे जमा – एसपींनी दिली महत्वाची माहिती

चौकशीतून माहिती उघड | एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शनैश्वर देवस्थानशी...

महाभूकंप! ८.७ तीव्रतेच्या भूकंपाने पॅसिफिक महासागर हादरला, त्सुनामीचा धोका

नगर सह्याद्री वेब टीम : रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची...

शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘दीप चव्हाण’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने दीप...

लाखो नागरिकांचे हाल, केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा; मनोज कोतकर यांची मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हात होत आहेत. त्यामुळे...