अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर तालुक्याच्या राजकारणात राजकीय घडामोडी घडत आहेत. इमामपूर येथील विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ. कर्डिले यांचे नेतृत्व मान्य करून भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
इमामपूर गावात गोविंद मोकाटे यांच्या गटाचे ग्रामपंचायत मध्ये सुमारे पंधरा ते वीस वर्षापासून एक हाती वर्चस्व होते. परंतु मंगळवार ( दि. २५) रोजी विद्यमान सरपंच बाजीराव आवारे, उपसरपंच लक्ष्मीबाई वाघमारे यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार कर्डिले यांचे नेतृत्व मान्य करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी गावातील विविध रस्ते व पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सुनील पवार, जेऊर माजी उपसरपंच बंडू पवार, आप्पासाहेब बनकर, उद्धव मोकाटे, मच्छद्रिं आवारे, चेअरमन शिवाजी काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेमुळे आमदार
तुमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेमुळेच मी आमदार झालो आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेची कामे, सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत आल्यामुळेच मतदार माझ्यावर विश्वास दाखवत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबरोबर विरोधकही माझ्याकडे आले तरी मी त्यांचे काम मार्गी लावतो. कोणताही दुजाभाव करत नाही.
– आ. शिवाजी कर्डिले
गावाच्या विकासासाठी आ. शिवाजी कर्डिले यांचे नेतृत्व मान्य
इमामपूर गावचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून सुटलेला नाही. गावचा विकास करायचा असेल तर कर्डिले यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच गावाच्या विकासासाठी कर्डिले यांचे नेतृत्व मान्य करत असल्याचे आवारे यांनी सांगितले.
– सरपंच बाजीराव आवारे