spot_img
अहमदनगरठाकरे गटाला धक्का? 'जोर का झटका'! 'यांचा' शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला धक्का? ‘जोर का झटका’! ‘यांचा’ शिंदे गटात प्रवेश

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. बड्या नेत्याचे सध्या महाराष्ट्रभर दौरे सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप आणि हेवे दावे करण्यात येत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना पुन्हा आणखी एक मोठा धक्का बसला आहे.ठाणे जिल्ह्याच्या ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख अनिता बिर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा अन् ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर तोफ डागल्याने ठाण्यातील ही सभा चांगलीच गाजली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, ठाण्याच्या महिला जिल्हा प्रमुख आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्याकाळापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे तसेच ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरिकांनो सावधान ; शहरात पी १ – पी २, पे अँड पार्कची अंमलबजावणी सुरू, पहा सविस्तर

  ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवाद व वर्तवणूक चांगली ठेवावी / नागरिकांनीही सहकार्य करावे, महासभेच्या...

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...