Nashik Teacher Constituency Election:नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणूकीत किशोर दराडे यांनी बाजी मारली. मंगळवारी पहाटे या मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यात आला. शिंदे गटाचे किशोर दराडे २६ हजार ४७६ मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतया मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या वगळणीफेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ३२ हजार ३०९ मतांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी हा निर्णय जाहीर केले.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात करण्यात आली. या निवडणुकीत एकूण ६४ हजार ८५३ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ६३ हजार १५१ मते वैध ठरली तर १ हजार ७०२ मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतया मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.
सोमवारी दुपारी कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेर्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये १९ व्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे (पाटील) हे बाद झाले. अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतया मतांचा कोटा निश्चित केला होता. १९ व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली. दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ५ हजार ६० मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे यांना तिसरा फेरी अखेर १७ हजार ३९३ मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची ६ हजार ७२ मते पडली.
दरम्यान मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ.गेडाम यांनी किशोर दराडे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करत त्यांना विजयी उमेदवारांचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.